नवी दिल्लीः BSNL ने आपल्या ६९९ रुपयांचा वाउचरला आता देशभरात उपलब्ध केले आहे. हे एक नवीन वाउचर आहे. बीएसएनएलने केरळ सर्कल सोडून बाकीच्या सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध केले होते. परंतु, आता KeralaTeecom च्या एका रिपोर्टनुसार, हे वाउचर आता केरळमध्ये सुद्धा उपलब्ध करण्यात आले आहे. ६९९ रुपयांच्या या वाउचरमध्ये सर्व बेनिफिट्स आधीचेच राहणार आहेत.

वाचाः

बीएसएनएलच्या ६९९ रुपयांच्या वाउचरमध्ये मिळणारे बेनिफिट्स
६९९ रुपयांच्या वाउचरमध्ये युजर्संना रोज ०.५ जीबी डेटा मिळतो. डेटा संपल्यानंतर याची स्पीड कमी होऊन ती 80Kbps होते. याशिवाय, या प्लानमध्ये युजर्संना रोज १०० एसएमएस आणि विना कोणत्याही FUP लिमिट शिवाय अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर केली जाते. या प्लानची वैधता १६० दिवसांची आहे.

वाचाः

या प्लानला रिचार्ज करण्यासाठी युजर्स बीएसएनएलच्या वेबसाइटवर जाऊ शखते. किंवा USSD कोड ‘*444*699#’ चा वापर करू शकता. याशिवाय PLAN BSNL699 लिहून १२३ वर एसएमएस करू शकता. युजर्संना हे निश्चित करायला हवे की मेसेज पाठवण्याआधी त्यांच्याकडे बॅलन्स शिल्लक असायला हवे.

वाचाः

बीएसएनएलने केरळमध्ये फ्री ४ जी सिम कार्ड देण्याची घोषणा केली होती. कंपनी ३१ जानेवारी पर्यंत प्रमोशन ऑफर अंतर्गत फ्री ४ जी सिम कार्ड ऑफर करीत आहे. ४ जी सिम कार्ड मिळवण्यासाठी युजर्सला १०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त फर्स्ट रिचार्ज कूपन रिचार्ज करावे लागणार आहे. यानंतर सर्व आवश्यक अटी पूर्ण कराव्या लागतील. त्यानंतर त्यांना फ्री ४ जी सिम कार्ड मिळेल.

वाचाः

याशिवाय, रिपब्लिक डे २०२१ ऑफर अंतर्गत कंपनी ३९८ रुपयांचा नवीन वाउचर सुद्धा ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग व १०० एसएमएस मिळते. तसेच या प्लानची वैधता ३० दिवसांची आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here