वाचाः
मोबाइलमध्ये वोटर कार्ड डाउनलोड करण्याची ही सुविधा दोन टप्प्यात मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच २५ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान केवळ नवीन मतदारांनी ही डिजिटल वोटर कार्ड डाउनलोड करता येऊ शकणार आहे. परंतु, यासाठी त्यांचा मोबाइल नंबर निवडणूक आयोगासोबत नोंदणीकृत असायला हवा. दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच १ फेब्रुवारी पासून सर्व वोटर्स आपल्या वोटर आयडी कार्डला डिजिटल रुपात डाउनलोड करू शकतात. यासाठी सुद्धा मोबाइल नंबर निवडणूक आयोगाच्या वेबसाइट सोबत रजिस्टर असायला हवा. हे काम तुम्ही निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन करू शकतात.
वाचाः
वोटर कार्डची डिजिटल कॉपीला डाउनलोड करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीचा वापर करू शकतात. पहिला म्हणजे मोबाइल अॅप (Voter Helpline) आणि दुसरा म्हणजे निवडणूक आयोगाची वेबसाइटवरून करू शकतात. जर तुमच्या फोनमध्ये अॅप नसेल तर तो अॅप डाउनलोड करावा लागेल किंवा आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन तुमचा मोबाइल नंबर ई-मेल आयडीवरून लॉग इन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Download e-EPIC हा पर्याय दिसेल. त्यानंतर मोबाइल नंबर किंवा वोटर कार्ड नंबर टाकून तुम्ही पीडीएफ मध्ये आपले मतदान ओळखपत्र (वोटर कार्ड) डाउनलोड करू शकता. पीडीएफ फाइलमध्ये एक क्यूआर कोड दिसेल. त्याला स्कॅन केल्यानंतर पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसेल.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times