वाचाः
नोकिया १.४ ला ब्रिटनच्या रिटेलर egenisys जवळ लिस्ट करण्यात आले आहे. या लिस्टिंग वरून उघड झाले आहे की, फोनमध्ये १ जीबी व १६ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. याआधी आलेल्या लीक रिपोर्टमधून ही माहिती समोर आली होती की, या फोनला ब्लू कलर व्हेरियंट मध्ये आणणार आहे. हँडसेटला कंपनीकडून ब्लू आणि ग्रे कलर व्हेरियंटमध्ये लाँच केले जाऊ शकते.
वाचाः
ई-रिटेलर कडे या फोनला ९४ यूरो म्हणजेच जवळपास ८ हजार ४०० रुपयांत लिस्ट करण्यात आले आहे. अमेरिकेत आधीच्या व्हेरियंट नोकिया १.३ ला ९९ डॉलर जवळपास ७ हजार २०० रुपयांत लिस्ट करण्यात आले आहे. याची खरी किंमत जाणून घ्यायची असेल तर या फोनच्या लाँचिंग पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. किंमतीशिवा नोकिया १.४ ला मॉडल नंबर TA-1322 सोबत थायलँडच्या NBTC सर्टिफिकेशन साइटवर पाहिले गेले आहे. यावरून हे संकेत मिळत आहेत की, फोनला आशियाई मार्केटमध्ये लाँच केले जाणार आहे.
वाचाः
नोकिया १.४ ची संभावित किंमत
नोकियाचा पुढील एन्ट्री लेवल हँडसेट नोकिया १.४ मध्ये ६.५ इंचाचा एलसीडी डिस्प्ले असू शकतो. डिस्प्ले एचडी प्लस रिझॉल्यूशन सोबत येईल. ई-रिटेलर कडे या फोनला ९४ यूरो म्हणजेच जवळपास ८ हजार ४०० रुपयांत लिस्ट करण्यात आले आहे. फोनमध्ये देण्यात आलेल्या चिपसेटची माहिती देण्यात आली नाही. परंतु, हँडसेटमध्ये १.३ गीगाहर्ट्ज क्वॉड कोर प्रोसेसर असू शकतो. या फोनमध्ये अपग्रेडेड ड्यूल लेन्स सेटअप असू शकतो. रियरवर ८ मेगापिक्सलचा व २ मेगापिक्सलचे दोन लेन्स दिले आहेत. फोनच्या पुढील बाजुस ५ मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये 4000mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. हा फोन अँड्रॉयड १० गो एडिशन सोबत लाँच केला जाऊ शकतो. नोकियाच्या या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर मिळण्याची शक्यता आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times