नवी दिल्लीः under 200: वोडाफोन-आयडिया युजर्स असाल तर तुम्हाला कमीत कमी २८ दिवसांची वैधता आणि रोज डेटाचे एक रिचार्ज प्लान हवा असल्यास कंपनीने काही खास प्लान आणले आहेत. २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या प्लानमध्ये ज्यात डेटा आणि २८ दिवसांची वैधता मिळते.

वाचाः

Vi 129 Plan
१३० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या या प्लानमध्ये युजर्संना २ जीबी डेटा मिळतो. या प्लानमध्ये २४ दिवसांची वैधता मिळते. तसेच कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंग आणि ३०० एसएमएस दिले जातात. या प्लानमध्ये अन्य कोणतेही बेनिफिट्स ऑफर केले जात नाही.

Vi 148 Plan
१५० रुपयांपेक्षा कमी किंमतीत रोज १ जीबी डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. हा प्लान १८ दिसवांच्या वैधतेसोबत येतो. याचाच अर्थ या प्लानमध्ये एकूण १८ जीबी डेटा ऑफर केला जातो. या प्लानमध्ये अन्य बेनिफिट्सची सुविधा मिळत नाही.

Vi 149 Plan
जर तुम्हाला रोज जास्त डेटा लागत असेल तर तुम्ही कमीत कमी २८ दिवसांच्या वैधतेसोबत रोज ३ जीबी डेटा मिळतो. तसेच अनलिमिटेड कॉलिंग आणि ३०० एसएमएस सुद्धा मिळते. हा प्लान युजरला व्हीआय मूव्हीज अँड टीव्हीचे फ्री अॅक्सेस देतो.

Vi 199 Plan
२०० रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा दिला जातो. तसेच कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० एसएमएस दिले जातात. हा प्लान २४ दिवसांच्या वैधतेसोबत येतो. या प्लानमध्ये व्हीआय मूव्हीज अँड टीव्हीचे फ्री अॅक्सेस दिले जातात.

वाचाः

वाचाः

वाचाः

वााचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here