नवी दिल्लीः () आज भारतात लाँच होणार आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कंपनीने ही माहिती दिली. गॅलेक्सी ए५१ आणि गॅलेक्सी ७१ ला कंपनीने गेल्या महिन्यात व्हिएतनाममध्ये लाँच केले होते. दोन्ही स्मार्टफोनमध्ये इनफिनिटी ओ डिस्प्ले म्हणजेच होल पंच डिस्प्ले आणि क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप आहे. गॅलेक्सी ए५१ हे ए५० चे अपग्रेड व्हर्जन आहे.

सॅमसंग इंडियाने आपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली आहे. सोमवारी करण्यात आलेल्या एका १० सेकंदाच्या व्हिडिओतून ही माहिती दिली आहे. आज लाँच होणाऱ्या या फोनची किंमत भारतात २२ हजार ९९० रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनीने अधिकृत किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. सॅमसंग गॅलेक्सी ए५१ (६ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज) च्या फोनची व्हिएतनाममध्ये जवळपास २४ हजार ६०० रुपये इतकी आहे. या फोनमध्ये प्रिझ्म क्रश ब्लॅक, व्हाइट, ब्लू आणि पिंक या रंगात उपलब्ध करण्यात येणार आहे.

या फोनमध्ये ड्युअल सॅमसंग गॅलेक्सी ए५१ अँड्रॉयड १० वर आधारित One UI 2.0 काम करतो. यात ६.५ इंचाचा फुल एचडी (१०८०x२४०० पिक्सल) सुपर अमोलेड इनफिनिटी ओ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर सह ८ जीबी पर्यंत रॅम दिला आहे. या फोनच्या मागे क्वॉड कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. प्रायमरी सेन्सर ४८ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. हा एफ २.० लेन्ससह २.० अपर्चरचा मेगापिक्सल सेन्सर सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. ५ मेगापिक्सला मायक्रो कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेऱ्याचा सेटअप दिला आहे. सेल्फीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए५१ मध्ये ३२ मेगापिक्सलचा सेन्सर दिला आहे. सॅमसंगच्या या फोनमध्ये इनबिल्ट स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकतो. तसेच मायक्रो कार्डच्या साहायाने गरज भासल्यास ती ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनला ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच १५ व्हॅटचा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here