नवी दिल्लीः ला याच महिन्यात Z-Series स्मार्टफोन च्या तीन आणखी स्मार्टफोनसोबत लाँच करण्यात आले होते. Lava Z2, Lava Z4 आणि Lava Z6 ला आधीच अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. आता कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, लावा झेड १ स्मार्टफोनची विक्री येत्या ५ फेब्रुवारी पासून सुरू करण्यात येणार आहे.

वाचाः

Lava Z1 ला अॅमेझॉन इंडियावर ब्लू आणि रेड कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे. हा फोन Lavamobiles.com वर सुद्धा उपलब्ध करण्यात आला आहे. फोनला ५ हजार ४९९ रुपयांत लाँच करण्यात आले होते. परंतु, लावाच्या हँडसेटला १ हजारांच्या सूट सोबत ४ हजार ९९९ रुपयांत विक्री केली जात आहे. ही ऑफर २८ फेब्रुवारी पर्यंत वैध राहणार आहे.

वाचाः

Lava Z1 फोनची वैशिष्ट्ये
Lava Z1 कंपनीचा झेड सीरीजचा सर्वात स्वस्त हँडसेट आहे. फोनमध्ये ५ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. यात सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शन दिला आहे. फोनमध्ये १.८ गीगाहर्ट्ज क्वॉड कोर मीडियाटेक हीलियो ए २० प्रोसेसर दिला आहे. २ जीबी रॅम प्लस १६ जीबी स्टोरेज दिला आहे. फोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

वाचाः

या फोनला पॉवर देण्यासाठी 3100mAh बॅटरी दिली आहे. अँड्रॉयड गो एडिशन बेस्ड XOS 6.2 वर चालतो. लावाच्या या फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. एलईडी फ्लॅश सोबत येते. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये ड्यूल 4G VoLTE, वाय फाय, 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि मायक्रो यूएसबी यासारखे फीचर्स दिले आहेत. हाँडसेटचे डायमेंशन 145.1x 73.3×10.26 मिलीमीटर आहे.

वाचाः

वाचाः

वााचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here