नवी दिल्लीः दिग्गज टेक्टनिकल कंपनी ने नोएडात आपले नवीन रिसर्च सेंटर उघडले आहे. या इमारतीची प्रेरणा ताज महल वरून घेण्यात आली आहे. याचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे या सेंटरमध्ये मायक्रोसॉफ्ट रिसर्चवर लक्ष देणार आहे. भारतातील हे मायक्रोसॉफ्टचे असे तिसरे सेंटर आहे.

वाचाः

मायक्रोसॉफ्टने नोएडा मध्ये इंडिया डेव्हलेपमेंट सेंटर एनसीआरची सुरुवात केली आहे. हे सेंटर देशातील तिसरे रिसर्च फॅसिलिटी सेंटर आहे. कंपनीने बेंगळुरू आणि हैदाराबाद मध्ये याआधीच दोन सेंटर उघडलेले आहेत. नोएडा युनिटची सर्वात खास बाब म्हणजेच याची बिल्डिंग डिझाइन ताज महल सारखी अतिशय सुंदर बनवण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टच्या या कार्यालयात ताज महलचा सर्वात मोठा फोटो आहे. याचा रंग सुद्धा ताज महल सारखा देण्यात आला आहे. ही पूर्णपणे इको फ्रेंडली पद्धतीने डिझाइन करण्यात आली आहे.

वाचाः

मायक्रोसॉफ्टच्या नोएडा फॅसिलिटी मध्ये आर अँड डी चे काम होणार आहे. नवीन टेक्नोलॉजीवर आधारित बिझनेस स्ट्रेटजीवर काम होणार आहे. क्लाउड, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरप्राइज सोल्यूशन आणि गेमिंग वर कंपनी फोकस करणार आहे. मायक्रोसॉफ्टचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव कुमारने सांगितले की, मायक्रोसॉफ्टचे वर्कप्लेस आयटी इंडस्ट्रीच्या भविष्याला पाहून बनवले आहे. ताज महल ची प्रेरणा घेण्यामागे खास उद्देश म्हणजे स्थानिक मटेरियलचा वापर व्हायला हवा. तसेच स्थानिक कलाकारांना समर्थन मिळायला हवे, हा होय. मायक्रोसॉफ्टने १९९८ मध्ये आपल्या हैदराबाद कॅम्पसमधून सुरूवात केली होती. यानंतर बेंगळुरू मध्ये असेच सेंट उघडण्यात आले होते. आता नोएडा मध्ये मायक्रोसॉफ्ट मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here