सुरुवातीच्या अंदाजानुसार कंपनी मार्चमध्ये हा स्वस्त आयफोन लाँच करणार असल्याचं सांगितलं जात होतं. या फोनचं नाव आयफोन ९ असेल, असंही बोललं जात आहे. या स्वस्त आयफोनची डिस्प्ले साईज सध्याच्या मॉडल्सपेक्षा कमी असू शकते. आयफोन ८ प्रमाणेच ४.७ इंच डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याची किंमत ३९९ डॉलर म्हणजे जवळपास २८ हजार रुपये असू शकते.
करोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. उद्योगांवरही याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. चीनमधील हुबेई प्रांतातून हा व्हायरस परसण्यास सुरुवात झाली. हेनान आणि गुआंगडोंगच्या जवळ हा प्रांत आहे. याच भागात Apple चे जास्तीत जास्त सप्लायर आहेत. या भागात १०० पेक्षा जास्त करोना व्हायरसची बाधा झालेले रुग्ण आढळले आहेत.
कसा असेल आयफोन ९
?
आयफोन ९ मध्ये आयफोन ११ मध्ये वापरण्यात आलेला A13 बायॉनिक चिपसेट दिलं जाणार आहे. इतर फीचर्समध्ये टच आयडी होम बटण, ४.७ इंच आकाराचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोटोग्राफीसाठी १२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असेल. आयफोन ११ मध्ये वापरलेली वायरलेस चार्जिंग फीचर असणारी बॅटरीही यामध्ये दिली जाण्याची शक्यता आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times