नवी दिल्लीः विवो सध्या आपल्या नवीन स्मार्टफोन वर काम करीत आहे. विवो S7 5G प्रमाणे हा फोन सुद्धा एक सेल्फी सेंट्रिक स्मार्टफोन आहे. फोनच्या लाँचिंग संबंधी कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नाही. परंतु, या दरम्यान, एक टिप्स्टरने या फोनच्या लाँचिंग तारीख आणि खास वैशिष्ट्ये संबंधी माहिती उघड केली आहे.

वाचाः

४४ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड ड्यूल सेल्फी कॅमेरा
चीनमधील एक टिप्स्टरच्या माहितीनुसार, विवो एस ९ ५जी स्मार्टफोन ६ मार्च रोजी मार्केटमध्ये एन्ट्री करणार आहे. लीकमध्ये दावा करण्यात आला आहे की, विवोच्या या फोनमध्ये ६.४ इंचाचा नॉच डिस्प्ले सोबत येणार आहे. याशिवाय या फोनमध्ये कंपनी ४४ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड ड्यूल सेल्फी कॅमेरा देणार आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की, विवोच्या या फोनमध्ये ६.४४ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो.

वाचाः

Dimensity 1100 SoC प्रोसेसरचा जगातील पहिला फोन
लीक मध्ये हा दावा करण्यात आला आहे की, हा फोन Dimensity 1100 SoC प्रोसेसर सोबत येणारा जगातील पहिला स्मार्टफोन असणार आहे. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, हा फोन ज्याला काही दिवसांपूर्वी मॉडल नंबर Vivo V2072A सोबत गुगल प्ले कन्सोल वर स्पॉट करण्यात आला आहे. लिस्टिंग नुसार, Vivo V2072A मध्ये रुंद नॉच सोबत Dimensity 1100 चिपसेट दिला आहे.

वाचाः

१२ जीबी रॅम असू शकतो
गुगल प्ले लिस्टिंग नुसार, हा फोन १२ जीबी रॅम आणि अँड्रॉयड ११ ओएस सोबत लाँच केला जाऊ शकतो. आधीच्या मॉडल प्रमाणे फोनमध्ये २५६ जीबी पर्यंत स्टोरेज ऑप्शन मिळू शकतो. फोनचे फीचर आणि वैशिष्ट्यांची डिटेल्स पुढील काही दिवसांनंतर समोर येऊ शकतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here