वाचाः
सोशल मीडियावर सध्या व्हेलेंटाइन डे निमित्त एक लिंक फिरवली जात आहे. ही लिंक ओपन करणे अनेकांना महागात पडू शकते. या मेसेजमध्ये म्हटले की, ताज हॉटेलकडून व्हेलेंटाइन डे निमित्त कूपन अथवा गिफ्ट कार्ड भेट देण्यात येत आहे. यात प्रेमीयुगुल ताज हॉटेल्समध्ये मुक्काम करू शकतात. परंतु, हे साफ खोटे आहे. असे कोणतेही कूपन किंवा गिफ्ट कार्ड हॉटेलकडून देण्यात येत नाही. असा मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेऊ नका. मेसेजमध्ये जी लिंक दिली आहे. ती ओपन करू नका. या लिंकला क्लिक केल्यास तुमची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी या लिंकविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच अशी लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका असे आवाहन सायबर पोलिस ठाणे, गुन्हे शाखा मुंबई यांनी केले आहे.
वाचाः
अज्ञात कोणतीही लिंक ओपन करू नये, अथवा माहिती नसलेल्या कोणत्याही लिंकला ओपन करून त्यात आपली स्वतःची माहिती भरू नये, असे केल्यास आपल्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. ताज हॉटेल आणि पोलिसांकडून नागरिकांना अलर्ट राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times