नवी दिल्लीः अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारी रोजी देशाचे बजेट २०२१ सादर केले. अर्थमंत्र्यांनी मेड इन इंडिया टॅबवरून बजेट सादर केल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर ट्विटरवर मेड इन इंडिया आणि आयपॅड ट्रेंड झाले आहे. अनेकांनी अंदाज बांधला होता की, अर्थमंत्र्यांनी अॅपलच्या मेड इन इंडिया टॅबलाइटवरून बजेट सादर केले. परंतु, आता दोन दिवसांनंतर याची माहिती उघड झाली आहे. बजेट २०२१ साठी भारतीय कंपनीचा टॅबलेटचा वापर करण्यात आला होता.

वाचाः

ज्या मेड इन इंडिया टॅबचा अर्थमंत्र्यांनी बजेट सादर करण्यासाठी वापर केला आहे. तो टॅबलेट लावा (Lava) कंपनीचा आहे. लावा इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि बिझनेस हेड सुनील रैना यांनी या दाव्याला दुजोरा दिला आहे. ज्या टॅबवरून बजेट सादर करण्यात आले आहे. तो टॅब लावा कंपनीचा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यांनी कटिंग सोबत ट्विट केले आहे. तो एक लावाचा टॅबलेट होता, असे सांगितले आहे. टॅबच्या फीचर्स संबंधी आणि किंमती संदर्भात अद्याप काहीही माहिती समोर आली नाही. वृत्तमानपत्राचे कात्रण सोबत लावाच्या टॅबचा कोणताही उल्लेख करण्यात आला नाही.

वाचाः

लावाच्या अधिकृत वेबसाइटवर तीन टॅबलेटची यादी देण्यात आली आहे. ज्यात Lava T81N एक प्रीमियम टॅब आहे. याची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. तसेच याची बॉडी मेटलची आहे. यात ५१०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच कनेक्टिविटीसाठी 4G VoLTE आहे. तसेच याशिवाय, Ivory Pop आणि Lava Magnum X1 टॅबला सुद्धा कंपनीच्या वेबसाइटवर पाहता येऊ शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here