नवी दिल्लीः मोटोरोलाचा फ्लॅगशिप स्मार्टफोन ला युजर्संकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या या फोनचा आज पहिला सेल आयोजित करण्यात आला होता. ज्यात १० हजार फोनच्या विक्रीला फक्त दोन मिनिटांचा वेळ लागला. चीनमध्ये या फोनची सुरुवातीची किंमत १९९९ चिनी युआन म्हणजेच जवळपास २२ हजार ५०० रुपये आहे. हा फोन दोन कलर ऑप्शन अमरल्ड ग्लेज आणि एमरल्ड लाइटमध्ये येते.

वाचाः

फोनची खास फीचर्स
फोनमध्ये 2520×1080 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.७ इंचाचा एलसीडी डिस्प्ले दिला आहे. डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशियो २१.९ आहे. हा ९० Hz रिफ्रेश रेट सोबत येतो. जबरदस्त व्ह्यूइंग एक्सपिरियन्स साठी फोनमध्ये HDR 10 सपोर्ट मिळाला आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 870 SoC प्रोसेसर दिला आहे. या प्रोसेसर सोबत येणारा हा पहिला स्मार्टफोन आहे. फोनमध्ये LPDDR5 रॅम दिली आहे जी LPDDR4 पेक्षा 72% फास्ट आहे. तसेच फोनमध्ये UFS 3.1 स्टोरेज दिला आहे.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक १६ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर कॅमेरा आणि एक टीओएफ कॅमेरा लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा दिला आहे. अँड्रॉयड ११ वर चालणाऱ्या या फोनमध्ये पॉवर साठी 5000mAh ची बॅटरी दिली आहे. २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here