नवी दिल्लीः व्हेलेंटाइन डे निमित्त ताज हॉटेलकडून तुम्हाला खास बक्षीस देण्यात येणार असून ताज हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आल्याचा सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. मुंबई पोलिस आणि ताज हॉटेलकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आले असून अशा फेक मेसेजवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेला काही तास उलटत नाही तोच आता टाटा कंपनीच्या नावाने एक फेक मेसेज सोशल मीडीयावर फिरत आहे.

वाचाः

आमच्या सर्वेक्षणासाठी तुमची निवड करण्यात आली आहे. केवळ एक मिनिटाचा वेळ लागेल. आणि तुम्हाला एक जबरदस्त भेट वस्तू शाओमीचा MI 11 T स्मार्टफोन फ्री मिळेल. बुधवारी आम्ही ५० जणांची निवड केली आहे. या सर्वांना बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. यात ५० लकी विजेते ठरणार आहेत. हा सर्वे आमची गुणवत्ता तपासण्यासाठी केला जात आहे. तसेच यात १०० टक्के बक्षीस देण्यात येणार आहे. तुम्हाला केवळ ४ मिनिट २४ सेकंदात या सर्वेतील प्रश्नाची उत्तर द्यायची असून बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. त्वरा करा, बक्षिसांची संख्या ही मर्यादीत आहेत, असा इंग्रजीमधील मेसेज तुम्हाला आल्यास त्यावर क्लिक करू नका अथवा त्या प्रश्नांची उत्तरे देत बसू नका, असे आवाहन मुंबई पोलीस आणि टाटा कंपनीने केले आहे.

सोशल मीडियावर सध्या व्हेलेंटाइन डे निमित्त एक लिंक फिरवली जात आहे. ही लिंक ओपन करणे अनेकांना महागात पडू शकते. या मेसेजमध्ये म्हटले की, ताज हॉटेलकडून व्हेलेंटाइन डे निमित्त कूपन अथवा गिफ्ट कार्ड भेट देण्यात येत आहे. यात प्रेमीयुगुल ताज हॉटेल्समध्ये मुक्काम करू शकतात. परंतु, हे साफ खोटे आहे. असे कोणतेही कूपन किंवा गिफ्ट कार्ड हॉटेलकडून देण्यात येत नाही. असा मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेऊ नका. मेसेजमध्ये जी लिंक दिली आहे. ती ओपन करू नका. या लिंकला क्लिक केल्यास तुमची आर्थिक फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी या लिंकविषयी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसेच अशी लिंक आल्यास त्यावर क्लिक करू नका असे आवाहन सायबर पोलिस ठाणे, गुन्हे शाखा मुंबई यांनी केले आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here