वाचाः
5000mAh बॅटरी आणि १५ वॉट फास्ट चार्जिंग
FCC ने सर्टिफाइड केलेल्या या फोनमध्ये काही वैशिष्ट्ये लीक झाली आहेत. FCC वर मॉडल नंबर SM-A325F वरून लिस्टेड करण्यात आलेल्या फोनमध्ये १५ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 5000mAh ची बॅटरी मिळू शकते. या फोनमध्ये ५जी व्हेरियंटचा वेगळा प्रोसेसर मिळू शकतो. गेल्या महिन्यात गीकबेंच लिस्टिंगमध्ये या फोनला मीडियाटेक हीलियो जी ८५ चिपसेट सोबत पाहिले गेले आहे.
वाचाः
या कलर ऑप्शनमध्ये मिळू शकतो फोन
काही दिवसांपूर्वी आलेल्या टिप्स्टर सुधांशू यांच्या लीक रिपोर्ट्समध्ये म्हटले होते की, कंपनी याला ब्लॅक, ब्लू, व्हाइट आणि लेवेंडर कलर ऑप्शनमध्ये आणू शकते. या रिपोर्टमध्ये हेही म्हटले की, कंपनी या फोनसोबत ब्लॅक आणि व्हाइट कलरचा S-View वॉल कवर देणार आहे. याशिवाय, गॅलेक्सी A32 4G खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ब्लॅक आणि ट्रान्सपॅरंट क्लियर कवर ऑप्शन मिळणार आहे.
वाचाः
गॅलेक्सी A32 5G चे फीचर
८ जीबी पर्यंत रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी व्ही डिस्प्ले दिला आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये Dimensity 720 चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा दिला आहे. ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा सुपर वाइल्ड अँगल, एक २ मेगापिक्सलचा डेप्थ आणि एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा दिला आहे.
वाचाः
सेल्फीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. यूरोपमध्ये या फोनची किंमत भारतीय रुपयांप्रमाणे २४ हजार ५०० रुपये आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times