नवी दिल्लीः विवो (Vivo) ने आपल्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने आणि स्मार्टफोन्सच्या किंमतीत ५ हजार रुपयांपर्यंत कपातीची घोषणा केली आहे. कंपनीने Vivo X50 स्मार्टफोनच्या किंमतीत ५ हजार रुपयांची तर Vivo V19 स्मार्टफोनच्या किंमतीत ३ हजार रुपयांची कपात केली आहे. विवो एक्स ५० स्मार्टफोन्सला ३४ हजार ९९० रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर या फोनची किंमत आता २९ हजार ९९० रुपये झाली आहे. तर Vivo V19 स्मार्टफोनला २४ हजार ९९० रुपयांत लाँच करण्यात आले होते. या फोनच्या किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर या फोनची किंमत आता २१ हजार ९९० रुपये झाली आहे.

वाचाः

Vivo X50 फोनचे खास फीचर्स
विवोच्या या फोनमध्ये ६.५६ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1080X2376 पिक्सल आहे. हे 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येते. विवोच्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवता येऊ शकते. विवोचा हा फोन अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टम बेस्ड Funtouch OS वर काम करतो. या फोनमध्ये मागे ४ कॅमेरे दिले आहेत. या स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. फोनच्या मागे ८ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4,200 mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

Vivo V19 स्मार्टफोनचे खास फीचर्स
विवोच्या या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१२ प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज दिला आहे. फोन अँड्रॉयड Android 10 वर बेस्ड FunTouch ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतो. या फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याचे रिझॉल्यूशन 1080X2400 पिक्सल आहे. स्मार्टफोनमध्ये बॅकला क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या मागे ४ कॅमेरे दिले आहेत. मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. फोनच्या फ्रंटला ड्यूल सेल्फी कॅमेरा दिला आहे. फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा मेन आणि ८ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here