नवी दिल्लीः डिजिटल फाईल व माहिती संग्रहित करण्यासाठी पेन ड्राइव्ह हे स्वस्त आणि पोर्टेबल असे एक साधन. लोक सहसा त्यांच्या महत्वाच्या गोष्टी जसे की महत्वाची कागदपत्रे, बॅकअप फाइल्स इत्यादी पेनड्राईव्हमध्ये सेव्ह करतात. जे लोक दिवसभर एकापेक्षा अधिक संगणकावर कार्य करतात त्यांच्यासाठी पेन ड्राइव्ह एक उत्तम साधन आहे. जर आवश्यक डेटा किंवा यूएसबी ड्राइव्हमध्ये संग्रहित असेल तर तो संकेतशब्दाने (पासवर्डने) सुरक्षित करणे खूप महत्वाचे आहे. आमच्यापैकी बरेचजण आवश्यक माहिती फोन, टॅब्लेट, हार्ड डिस्क किंवा पेन ड्राइव्ह सारख्या वैयक्तिक डिव्हाइसमध्ये काही आवश्यक माहिती संकलित करतात.

वाचाः

आपण अशा ठिकाणी जतन केलेली माहिती इतरांबरोबर शेअर करायची नसल्यास पेन ड्राईव्हवर संकेतशब्द (पासवर्ड) ठेवला पाहिजे. येथे आम्ही पेन ड्राईव्हवर संकेतशब्द (पासवर्ड) कसा वापरावा हे सांगत आहोत. येथे आम्ही तुम्हाला यूएसबी पेन ड्राईव्हच्या सुरक्षिततेसाठी संकेतशब्द लागू करण्याच्या सोप्या युक्तीबद्दल सांगत आहोत. विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये हे वैशिष्ट्य बाय डीफॉल्ट आहे इनबिल्ट आहे. यासाठी, आपल्याला फक्त या सोप्या कृती करण्याची आवश्यकता आहे.

वाचाः

स्टेप पहिली
सर्वप्रथम आपला यूएसबी पेन ड्राइव्ह संगणकाला जोडा. यानंतर, ड्राइव्हवर उजवीकडे क्लिक करा. आता ‘Turn on BitLocker’ पर्याय निवडा.

स्टेप दुसरी
आता ‘युज पासवर्ड टू प्रोटेक्ट द ड्राईव्ह’ वर क्लिक करा. यानंतर, आता असा संकेतशब्द (पासवर्ड) टाका जो लक्षात ठेवायला सोपा आहे. हा संकेतशब्द दोन्ही ठिकाणी सेट करा.

स्टेप तिसरी
‘सेव्ह द की फॉर फ्युचर रेफरन्स’ येत नाही तोपर्यंत नेक्स्ट बटणावर क्लिक करत राहा.

स्टेप चौथी
आता आपोआप एन्क्रिप्शन प्रक्रियेला सुरुवात होईल. यानंतर आपण सेट केलेल्या संकेतशब्दासह पेन ड्राइव्ह सुरक्षित होईल.

स्टेप पाचवी
संकेतशब्द सेट केल्यानंतर तो कुठेतरी लिहा. जेणेकरून संकेतशब्द विसरल्यास, आपण तो पुन्हा वापरण्यास सक्षम असाल.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here