नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. क्यूआर कोड हे एक त्यांचे महत्त्वाचे शस्त्र बनले आहे. आपण जर करून पेमेंट करीत असाल तर आपल्याला थोडे सावध राहण्याची गरज आहे. आपण बऱ्याचदा दुकानदारला ऑनलाइन पैसे पाठवताना क्यूआर कोडचा वापर करत असतो. त्यामुळे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर तुमची फसवणूक होऊ शकते. कशी ती जाणून घ्या.

वाचाः

Quick Response (QR) ला सर्वात आधी जपानमध्ये बनवण्यात आले होते. आता भारतात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. त्यामुळे थोडे सावध राहण्याची गरज आहे. क्यूआर कोड फिशिंग काय आहे, तसेच यापासून तुम्हाला कसा धोका आहे, याची सविस्तर माहिती जाणून घ्या. ज्या प्रकारे तुम्ही डिजिटल देवाण घेवाण करीत असतात. त्यावेळी अनेक जण फ्रॉड करण्यासाठी टपून बसलेले असतात. कॉन्टॅक्टलेस पेमेंट करताना अनेक जण स्कॅन करून पेमेंट ट्रान्सफर करीत असतात. फ्रॉडस्टर त्यावेळी याचा गैरफायदा घेत असतात. क्यूआर कोडला बदल करीत असतात. ज्यामुळे पेमेंट फ्रॉडस्टरच्या अकाउंटला जाते. यावेळी क्यूआर कोड बदलून तसेच क्यूआर कोड टाकल्यानंतर क्यूआर कोड फिशिंग केले जाते. यामुळे अशावेळी पैसे दुकानदाराच्या खात्यात न जाता फ्रॉडस्टरच्या अकाउंटमध्ये जाते.

वाचाः

क्यूआर कोड फिशिंगची वेगवेगळी पद्धत आहे. यासाठी स्कॅमर तुम्हाला मेसेज किंवा ईमेल द्वारे क्यूआर कोड सेंड करीत असतात. ज्यात तुम्हाला १० हजार रुपयांची लॉटरी लागली असल्याची खोटी माहिती सांगितली जाते. ज्यात तुमचा यूपीआय पिन देऊन पैसे आपल्या बँक अकाउंटमध्ये घेतले जातात. ज्यावेळी तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करीत असतात त्यावेळी यूपीआय पिन मागितला जातो. तुम्हाला वाटेल की, पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील. परंतु, यूपीआय पिन देताच तुमचे पैसे स्कॅमर अकाउंट मध्ये जातात. तसेच पेट्रोल पंप किंवा दुकानदारकडे तुम्ही क्यूआर कोड स्कॅन करून पैसे देत असतात त्यावेळी क्यूआर कोड बदलण्याची शक्यता असते. क्यूआर कोड स्कॅन करताना पेमेंट स्कॅमर अकाउंटमध्ये ट्रान्सफर करीत असतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here