नवी दिल्लीः टेक्‍नो या जागतिक प्रीमिअम स्‍मार्टफोन ब्रॅण्‍डने आज चार वर्षांहून कमी कालावधीत भारतात ८ दशलक्षहून जास्त ग्राहकांचा टप्‍पा गाठल्याची घोषणा केली आहे. टेक्‍नोला ६ दशलक्षवरून ८ दशलक्षहून अधिक ग्राहकांचा टप्‍पा गाठण्‍यासाठी फक्‍त ४ महिने (ऑक्‍टोबर ते जानेवारी) लागले असल्याची माहिती टेक्नो कंपनीने दिली आहे.

वाचाः

आकर्षक दरांमधील ‘सेगमेंट-फर्स्‍ट’ स्‍मार्टफोन्‍स भारतामध्‍ये सादर करण्‍याच्‍या उत्पादनाला अधिक दृढ करतो. टेक्‍नोने डॉट नॉच डिस्‍प्‍ले, सर्वात मोठी स्क्रिन, भावी प्रीमिअम डिझाइन, एआय-समर्थित क्‍वॉड कॅमेरा, ड्युअल-सेल्‍फी कॅमेरा, व्‍यापक क्षमतेच्या बॅटरीने युक्‍त सर्वात किफायतशीर स्‍मार्टफोन्‍स सादर करण्‍यामध्‍ये बेंचमार्क स्‍थापित केला आहे. टेक्‍नोने गेल्‍या वर्षी नोव्‍हेंबरमध्‍ये आयोजित केलेल्‍या ग्रेट टेक्‍नो फेस्टिवलच्‍या भाग्‍यवान विजेत्‍यांची घोषणा केली. या स्‍पर्धेने ग्राहकांना आकर्षक बक्षीसे जिंकण्‍याची संधी दिली होती, ज्‍यामध्‍ये मारूतीची एस-प्रेसो कार, हिरो पॅशन प्रो मोटरसायकल्‍स, टेक्‍नोचा कॅमेरा-केंद्रीत कॅमॉन १५ प्रो आणि स्‍टायलिश हायपॉड्स एच२ इअरबड्सचा समावेश होता. ही बक्षीसे नोव्‍हेंबर २०२० मध्‍ये कोणत्‍याही टेक्‍नो स्‍मार्टफोनच्‍या खरेदीवर लकी ड्रॉच्‍या माध्‍यमातून देण्‍यात आली होती.

वाचाः

तरूण भारतीयांच्‍या महत्त्वाकांक्षा लक्षात घेत डिझाइन व विकसित करण्‍यात आलेली बेस्‍टसेलर ‘स्‍पार्क सिरीज’, मध्‍यम-ते-प्रीमिअम विभागावर लक्ष्‍य करणाऱ्या उल्‍लेखनीय कॅमेरा वैशिष्‍ट्यांनी युक्‍त लोकप्रिय कॅमेरा-केंद्रित सिरीज ‘कॅमॉन’, मध्‍यम विभागातील मल्‍टी-टास्‍कर्स, गेमिंग उत्‍साहींच्‍या गरजा पूर्तता करण्‍यासाठी अधिक शक्तिशाली स्‍मार्टफोन अनुभव देणारा ‘पोवा’. टेक्‍नोने गेल्‍या वर्षी मिनीपॉड्स एम१ व हायपॉड्स एच२ सह स्‍मार्टफोन अॅक्‍सेसरीज क्षेत्रामध्‍ये देखील यशस्‍वीरित्‍या प्रवेश केला अशी माहिती ट्रान्झिशन इंडियाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरिजीत तालापात्रा यांनी यावेळी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here