नवी दिल्लीः रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या युजर्संना वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे प्लान ऑफर करते. यात जिओ फोन युजर्ससाठी अनेक बेस्ट ऑल इन वन प्लानचा समावेश आहे. स्वस्त किंमतीतील प्लान्समध्ये २८ दिवसांची वैधतासोबत ५६ जीबी पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट दिले जाते. जाणून घ्या डिटेल्स..

वाचाः

जिओचा ७५ रुपयांचा प्लान
२८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये कंपनी एकूण ३ जीबी डेटा देते. अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट देते. तसेच या प्लानमध्ये ५० फ्री एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

जिओचा १२५ रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानमध्ये रोज ०.५ जीबी डेटा याप्रमाणे एकूण १४ जीबी डेटा दिला जातो. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग सोबत ३०० फ्री एसएमएस दिले जातात. प्लानच्या सब्सक्रायबर्सला कंपनी जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन देते.

जिओचा १५५ रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानमध्ये रोज १ जीबी डेटा दिला जातो. २८ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस दिले जाते. प्लानच्या सब्सक्रायबर्सला सर्व नेटवर्कवर फ्री कॉलिंगची सुविधा मिळते. जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस दिले जाते.

जिओचा १८५ रुपयांचा प्लान
ऑल इन वन कॅटेगरीत हा जिओचा सर्वात महागडा प्लान आहे. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा दिला जातो. ग्राहकांना एकूण ५६ जीबी डेटा दिला जातो. बाकीच्या प्लान्सप्रमाणे अनलिमिटेड कॉलिंग, डेली फ्री एसएमएस आणि जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here