नवी दिल्लीः भारतातील काही युजर्सला ट्विटर वापरताना अडचण येत आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर मध्ये शुक्रवारी रात्रीपासून ही समस्या येत आहे. डाउन डिटेक्टर वर सुद्धा सर्विस आउटेज असल्याचा दुजोरा मिळाला आहे. डाउन डिटेक्टर वर देशभरात जवळपास ९०० युजर्संने ट्विटर ठप्प झाल्याची तक्रार केली आहे. ट्विटर ठप्प झाल्याची तक्रार वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर दिसत आहे.

वाचाः

डाउन डिटेक्टरच्या माहितीनुसार, ट्विटर युजर्सला वेबसाइटरचा वापर करण्यात अडचण येत आहे. ऑनलाइन सर्विसेसजला ट्रॅक करणारी वेबसाइट डाउन डिटेक्टरने दावा केला आहे की, आयओएस अॅपवर काही युजर्सला ट्विटरवर वापर करताना अडचण येत आहे. ट्विटरवर शुक्रवारी रात्रीपासून युजर्संना स्लो लॉगिन आणि लोडिंगची समस्या येत आहे. ही समस्या शुक्रवारी रात्री ९ वाजेपासून सुरू झाली आहे. देशातील मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, अहमदाबाद, मदुरा आणि बेंगळूरू या शहरातील युजर्संना मोठी अडचण येत आहे.

वाचाः

ट्विटर ठप्प होण्याची तक्रार सर्वात जास्त अँड्रॉयड व डेस्कटॉप युजर्संना होत आहे. आयफोनवर सुद्धा ट्विटर हळू चालत आहे. तसेच अपलोड होण्यास अडचण येत आहे. आता तिन्ही प्लॅटफॉर्मवर ट्विटर ठीक काम करीत आहे. आता कुणाची तक्रार नाही. ट्विटरने अधिकृतपणे डाउन झाल्याला दुजोरा दिला नाही. तसेच भारताशिवाय अन्य कोणत्याही देशातील ट्विटर युजर्संनी याविषयी तक्रार केली नाही.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here