नवी दिल्लीः फ्लॅगशीप स्मार्टफोन मार्केटमध्ये गेल्या काही महिन्यापासून जबदस्त फोनची एन्ट्री झाली आहे. युजर्संना कमी किंमतीत टॉप अँड फ्लॅगशीप स्मार्टफोन्स जास्त पसंत पडतात. युजर्संची डिमांड पाहून कंपन्यांनी ३० ते ४० हजार रुपयांदरम्यान जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या डिव्हाइसमध्ये दमदार प्रोसेसर, कॅमेरा सोबत अनेक खास फीचर्स देत आहेत. या फोनची किंमत ४० हजार रुपयांपेक्षा कमी आहे.

वाचाः

शाओमी Mi 10T प्रो
या फोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा आयपीएस एलसीडी फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८६५ चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले आहे. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सोबत एक १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि एक ५ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स दिला आहे. २० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळते.

वाचाः

रियलमी X7 प्रो
रियलमीचा हा लेटेस्ट फ्लॅगशीप फोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये मीडियाटेक Dimensity 1000 Plus 5G प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये ६.५५ इंचाचा सुपर अमोलेड स्क्रीन मिळतो. फोटोग्राफीसाठी यात क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला आहे. एक ८ मेगापिक्सलचा आणि दोन २ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh ची बॅटरी दिली आहे. ६५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.

वाचाः

सॅमसंग गॅलेक्सी S20 फॅन एडिशन
या फोनच्या ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेजच्या फोनची किंमत ३७ हजार ९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६.५ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये Exynos 990 4G चिपसेट दिला आहे. फोनमध्ये रियरमध्ये तीन कॅमेरे दिले आहे. ज्यात १२ मेगापिक्सलचा आणि एक ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी यात ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये २५ वॉटची फास्ट चार्जिंग सोबत 4500mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here