नवी दिल्लीः पबजीला टक्कर देण्यासाठी म्हणून भारतात २६ जानेवारीला गेम मोठ्या दिमाखात लाँच करण्यात आला आहे. हा गेम सध्या केवळ अँड्रॉयड प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारकडून याला प्रमोट करण्यात आले होते. या गेमकडून भारतीय पबजी चाहत्यांना मोठी अपेक्षा होती. परंतु, अनेक पबजी चाहत्यांना हा गेम आवडला नाही. लाँचनंतर गुगल प्ले वर गेमची रेटिंग ४.५ होती. परंतु, गेल्या काही दिवसांत ही लागोपाठ १ स्टार रेटिंग्स मिळत आहे.

वाचाः

१] अनावश्यक उत्सूकता
या गेमचा प्रचार – प्रसार करण्यासाठी बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार मैदातान उतरला होता. आत्मनिर्भर भारत आणि भारतीय सैनिकांना पाठिंबा देणयासाठी जोरदार सपोर्ट करण्यात आला होता. त्याला प्रमोट सुद्धा चांगले करण्यात आले होते. चीनी अॅपवर बंदी घातल्यानंतर भारतीय आणि चीन सैनिकांत धुमश्चक्री झाल्याचे पाहायला मिळाले होते. पबजी गेम बंद झाल्यानंतर याची लाँचिंग करण्यात आल्याने या गेमकडून खूप अपेक्षा व्यक्त केला जात होत्या.

वाचाः

२] कंटाळवाना प्लेयर सिंगल मोड
खूप उत्सूकता असलेला आणि जबरदस्त प्रमोशन केल्यानंतर लाँच झालेला FAU-G गेम खूपच सिंपल निघाला. गेममध्ये सध्या सिंगल प्लेयर कॅम्पेंन मोड आहे. ज्याला केवळ एका बटनावर वारंवार टॅप करून कंटाळा येतो. म्हणजेच हे खूपच कंटाळवाना झाला आहे. सुरुवातीला खेळताना हे कदाचित चांगले वाटेल परंतु, नंतर खूपच कंटाळवाने वाटू लागते.

वाचाः

३] बंदूक पर्यायाची कमतरता
FAU-G गेममध्ये तुम्ही लेफ्टिनेंट सिंह आहात. तुमच्या रेजिमेंटवर गलवान खोऱ्यात चीनी सैनिकांकडून हल्ला केला जातो. गेम प्ले खूपच सिंपल आहे. ज्यात शत्रूंच्या झुंडी विरुद्ध लढाई लढली जाते. या गेममध्ये काहीच नवीन पाहायला मिळत नाही. गेममध्ये शस्त्रांच्या नावावर केवळ दंडूके दिले जातात. तर तुम्हाला हात पायांनी फाईट करावी लागते. पहिला बटन हिट आणि दुसरा ब्लॉक आहे. ज्यात ब्लॉक बटनची कधी तरी आवश्यकता पडते. या गेममधून सर्व अॅक्शन शूटर गेमकडून जे अपेक्षित असते ते गायब आहे.

वाचाः

४] बॅटल रॉयल मोड नाही
FAU-G गेम साधा गेम आहे. त्यामुळे तो खेळायला खूपच बोरिंग आहे. गेममध्ये PUBG Mobile गेमप्रमाणे Battle Royale Mode देण्यात आला नाही. गेमच्या होम स्क्रीनवर दोन मोड्स दिले आहेत. जे अॅक्टिव नाहीत. nCore Games च्या म्हणण्यानुसार गेममध्ये लवकरच ‘Free For All’ आणि 5v5 ‘Team Deathmatch’ मोड जोडले जाऊ शकतात.

वाचाः

५] ग्राफिक्स आणि बग्स
गेमचे ग्राफिक्स २०२१ मध्ये लाँच करण्यात आलेल्या अन्य गेम्सच्या तुलनेत खूपच जुने वाटतात. डिटेल्सची कमी आहे. गेममध्ये काही बग्स आहेत. अनेकदा असे होते की चारही बाजुने तुम्हाला घेरले जाते. परंतु, तुमच्यावर कुणीच हल्ला करीत नाही.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here