नवी दिल्लीः देशात नोटबंदीनंतर डिजिटल पेमेंट अॅप्समध्ये प्रचंड वाढ झाली आहे. नोटबंदीनंतर लोकांनी कॅश नसल्याने या अॅप्सवर सर्वात जास्त पेमेंट केले आहे. आता गेल्या काही दिवसांपासून करोना व्हायरस मुले लोकांनी देशात डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले आहे. आता देशात डिजिटल पेमेंट युजर्स लागोपाठ वाढत आहे. देशातील मोठी टेक्नोलॉजी कंपन्या सुद्धा डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहे. नुकतीच देशातील एक डिजिटल पेमेंट अॅपने भारतातील आपली सर्विस बंद करण्याची घोषणा केली आहे. जर तुम्ही या अॅपचा वापर करीत असाल तर लवकर आपले पैसे यातून काढून घ्या. तसेच आपले अकाउंट डिअॅक्टिव करणे, हे चांगले आहे.

वाचाः

बंद होणार अॅप
मीडिया सोर्सच्या माहितीनुसार, डिजिटल PayPal देशातून बंद करण्यात येणार आहे. आता या अॅपची सेवा १ एप्रिलपासून बंद करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी PayPal चा वापर सुरू राहणार आहे. जर तुम्ही पे पलचा वापर करीत असाल तर आपल्या अकाउंटला डिअॅक्टिव करू शकता. जर आपण अकाउंट डिअॅक्टिव करू इच्छित असाल तर तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे. सर्वात आधी तुम्ही PayPal च्या वेबसाइटवर जा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा. सेटिंगमध्ये गेल्यानंतर अकाउंट ऑप्शनमध्ये जा. यानंतर आपल्या बँकच्या अकाउंट नंबर टाका. त्यानंतर नवीन पेजवर जाऊन क्लोज अकाउंटवर क्लिक करा. जर तुमचे अकाउंट अशाप्रकारे बंद होणार नसेल तर तुम्ही ईमेल वरूनही या अकाउंटला बंद करू शकता.

वाचाः

PayPal जगभरात जवळपास १९० देशात आपली सर्विस देते. या देशात जवळपास १०० मिलियन अकाउंट मेंबर आहेत. भारतात PayPal ने २०१७ मध्ये आपली सेवा सुरू केली होती. डिजिटल पेमेंट ही एक वेबसाइट आहे. ज्यावरून ऑनलाइन पेमेंट केली जाते. तर याच्या मदतीने अनेक युजर्सं आंतरराष्ट्रीय लेवलवर ट्रान्झॅक्शन करू शकता. PayPal च्या मदतीने युजर्स एका देशातून दुसऱ्या देशात सोप्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर करू शकतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here