वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात देशातील ऑनलाइन व्यवहारांमध्ये मोठी तेजी निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. ‘नीती आयोगा’ने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २०२१मध्ये ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस’ अर्थात ‘यूपीआय’च्या माध्यमातून २३० कोटींहून अधिक व्यवहार झाले आहेत. या कालावधीतील व्यवहारांचे एकूण मूल्य ४ लाख २० हजार कोटी रुपयांहून अधिक होते. जानेवारी २०२०च्या ‘यूपीआय’ व्यवहारांच्या तुलनेत यंदा ७५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

वाचाः

तत्पूर्वी डिसेंबर २०२०मध्ये ‘यूपीआय’ आणि ‘भीम’च्या माध्यमातून विक्रमी २२३ कोटींहून अधिक व्यवहारांची नोंद झाली होती. या कालावधीतील व्यवहारांचे एकूण ४ लाख १६ हजार कोटी रुपयांहून अधिक होते. नोव्हेंबरमध्ये २२१ कोटींहून अधिक व्यवहार झाले होते. या माध्यमातून ३ लाख ९० हजार कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली होती. करोनापूर्व कालखंडाबाबत बोलायचे झाल्यास फेब्रुवारी २०२०मध्ये ‘यूपीआय’च्या माध्यमातून सर्वाधिक व्यवहारांची नोंद करण्यात आली होती. फेब्रुवारीमध्ये १३३ कोटी व्यवहारांच्या माध्यमातून २ लाख २२ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची देवाणघेवाण झाली होती.

वाचाः

करोनाकाळात ‘यूपीआय’च्या मदतीने एप्रिल २०२०मध्ये एक लाख ५१ हजार कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली होती. त्यानंतर आश्चर्यकारकरित्या मे महिन्यात व्यवहारांमध्ये वाढ नोंदविण्यात आली होती. मे महिन्यात ‘यूपीआय’द्वारा दोन लाख १८ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची देवाणघेवाण झाली होती. ऑक्टोबरमध्ये २०७ कोटी रुपयांहून अधिक रकमेची देवाणघेवाण झाली होती.

‘यूपीआय’ अॅपच्या बाबतीत ‘फोन पे’ने ’ला धोबीपछाड दिला आहे. ‘नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’तर्फे (एनपीसीआय) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबरमध्ये ‘फोन पे’द्वारे ९०.२० कोटी व्यवहार झाले आहे. या माध्यमातून एकूण एक लाख ८२ हजार कोटी रुपयांची देवाण-घेवाण झाली आहे. ‘एनपीसीआय’ने नमूद केल्यानुसार डिसेंबर महिन्यात ‘यूपीआय’च्या माध्यमातून विक्रमी २२३ कोटींपेक्षा अधिक व्यवहार झाले आहेत. या माध्यमातून एकूण चार लाख १६ हजार कोटी रुपयांहून अधिक देवघेव झाली आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here