वाचाः
व्हॉट्सअॅपला आपल्या नवीन पॉलिसी अंतर्गत नुकसान सहन करावे लागले आहे. जानेवारी मध्ये सर्वात जास्त डाउलनोड होणाऱ्या अॅप्समध्ये टेलिग्राम नंतर टिकटॉक, सिग्नल, आणि फेसबुक यांचा नंबर लागतो. सर्वात जास्त डाउनलोड होणाऱ्या अॅपमध्ये व्हॉट्सअॅप पाचव्या स्थानावर गेले आहे. याआधी व्हॉट्सअॅप या यादीत तिसऱ्या स्थानावर होते. टेलिग्रामला भारतानंतर सर्वात जास्त इंस्टॉलेशन बेस इंडोनेशियामधून मिळाले आहे. टेलिग्रामला मिळालेल्या डाउनलोड मध्ये इंडोनेशियाची भागीदारी १० टक्के आहे.
वाचाः
TikTok सर्वात जास्त डाउनलोड होणाऱ्या अॅपच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. टिकटॉकला जानेवारीत ६.२ कोटी डाउनलोड मिळाले आहेत. या डाउनलोडमध्ये चीनची सर्वात जास्त भागीदारी १७ टक्के आहे. यानंतर अमेरिकेमधील भागीदारी १० टक्के आहे. दरम्यान टिकटॉकवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. भारतात गेल्या वर्षी टिकटॉकवर बंदी घातली आहे. अद्याप टिकटॉकवर भारतात बंदी आहे. भारतात टिकटॉक, पबजी शिवाय, १०० हून जास्त चायनीज अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
वाचाः
डिसेंबर २०२० मध्ये सर्वात जास्त डाउनलोड होणारे अॅप टिकटॉक होते. परंतु, वॉट्सअॅपच्या नव्या पॉलिसीमुळे टेलिग्रामला सर्वात जास्त फायदा झाला आहे. जानेवारी २०२१ मध्ये नॉन गेमिंग अॅप्समध्ये Instagram सहाव्या नंबर वर आले आहे. यानंतर Zoom, MX Taka Tak, Snapchat, आणि Messenger आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times