नवी दिल्लीः ची वाट आता जास्त पाहावी लागणार नाही. कंपनी प्रसिद्ध गॅलेक्सी एफ सीरीजच्या या नवीन फोनला १५ फेब्रुवारी रोजी लाँच करणार आहे. ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर सॅमसंगच्या या अपकमिंग फोनचे लँडिंग पेजवर अपडेट करण्यात आले आहे. या फोनच्या लाँचिंग तारीख संबंधी सोबतच रियल आणि फ्रंट पॅनेलच्या डिझाइनवरून पडदा हटवला आहे.

वाचाः

फोनमध्ये स्क्वेयर शेप कॅमेरा मॉड्यूल
सॅमसंगचा हा फोन १५ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता लाँच करण्यात येणार आहे. फ्लिपकार्टवर लाइव्ह झालेल्या या फोटोत हा फोन खूपच जबरदस्त दिसत आहे. फोनमध्ये पंचहोल डिझाइनचा डिस्प्ले दिला आहे. तसेच याच्या रियर पॅनेलवर ग्रेडियंट फिनिश शिवाय एलईडी फ्लॅश सोबत स्क्वेयर शेप कॅमेरा मॉड्यूल दिला आहे. फोनमध्ये तुम्हाला साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.

वाचाः

Exynos 9825 चिपसेट मिळणार
सॅमसंग गॅलेक्सी एफ ६२ गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. गेल्या आठवड्यात टिप्स्टर मुकुल शर्माने दावा केला होता की, हा फोन एक फ्लॅगशीप प्रोसेसरसोबत येणार आहे. जो परफॉर्मन्स मध्ये स्नॅपड्रॅगन ७६५ जी पेक्षा अधिक चांगला असणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात गीकबेंच लिस्टिंगवर हा फोन Exynos 9825 चिपसेट सोबत पाहिला गेला आहे. फ्लिपकार्टवर लाइव्ह करण्यात आलेल्या अपडेटड पेजनुसार, गॅलेक्सी एफ ६२ मध्ये हे प्रोसेसर मिळणार आहे.

वाचाः

7000mAh बॅटरी आणि 32MP फ्रंट कॅमेरा
फोनच्या फीचर्स संबंधी कंपनीकडून अद्याप जास्त माहिती शेयर करण्यात आली नाही. लीक रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, या फोनमध्ये 7000mAh बॅटरी सोबत ६.७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. या फोन ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत लाँच होणार आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा फ्रंट आणि ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा मिळू शकतो. या फोनची किंमत २५ हजार रुपयांच्या जवळपास असू शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here