नवी दिल्लीः जर तुम्ही स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले म्यूझिक अॅप (Google Play Music) चा वापर करीत असाल तर तुम्हाला थोडे निराश करणारी बातमी आहे. अँड्रॉयड स्मार्टफोन युजर्स वापर करीत असलेला हे अॅप या महिन्यातील २४ तारखेपासून बंद होणार आहे.

वाचाः

गेल्या ८ महिन्यांपासून सुरू होते म्यूझिक अॅप
मिळालेल्या माहितीनुसार, गुगल आपल्या प्ले म्यूझिक (Google Play Music) अॅपला यूट्यूब म्यूझिक () अॅपवरून रिप्लेस करीत आहे. कंपनीने गेल्या वर्षी यासंबंधीची घोषणा केली होती. हे अॅप गेल्या ८ वर्षापासून सुरू होते.

वाचाः

लोकांना मिळतोय शटडाउनचा मेसेज
अँड्रॉयड़ युजर्संना हे अॅप उघडल्यानंतर कंपनीकडून शटडाउनचा मेसेज मिळत आहे. मेसेजमध्ये युजर्संना म्हटले जात आहे की, २४ फेब्रुवारी २०२१ पासून तुमचा सर्व डेटा रिमूव्ह करण्यात येणार आहे. यात तुमचे म्यूझिक लायब्रेरी, सर्व अपलोड्स, पर्चेजेज किंवा काही गुगल प्ले म्यूझिक अॅप या सर्वांचा यात समावेश आहे. या दिवसांनंतर याला रिकवर करण्याची कोणतीही सोय करण्यात आली नाही. युजर्संना मेसेजमध्ये म्यूझिक रिप्लेस करण्याचा पर्याय सुद्धा मिळत आहे.

वाचाः

२०११ मध्ये लाँच करण्यात आले होते प्ले म्यूझिक अॅप
गुगलने काही वेळेआधी यूट्यूब म्यूझिक (YouTube Music) लॉन्च केले होते. त्यानंतर कंपनी प्ले म्यूझिक (Google Play Music) बंद करणार आहे, अशी माहिती मिळत होती. गुगलने आपल्या एका ब्लॉग पोस्टमध्ये प्ले म्यूझिकला युट्यूब म्यूझिक रिप्लेस करणार आहे. याचाच अर्थ युजर्स प्ले म्यूझिकवर कोणतेही गाणे आता वाजू शकणार आहे. कंपनीने गुगल प्ले म्यूझिक प्ले अॅपला २०११ मध्ये लाँच केले होते.

वाचाः

असे ट्रान्सफर करा डेटा
गुगल प्ले म्यूझिकवरून यूट्यूब मध्ये ट्रॅक्सला मायग्रेट करू शकता. अॅप ओपन केल्यानंतर Google Play Music No longer Available अशा शब्दात मेसेज येत आहे. या ठिकाणी गूगल प्ले म्यूझिक (Google Play Music)च्या कंटेंट ला यूट्यूब म्यूझिक मध्ये ट्रांसफ़र करू शकता. तसेच तुम्ही रिकमंडेशन हिस्ट्री डिलीट करू शकता.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here