नवी दिल्लीः देशातील प्रसिद्ध नेटवर्क प्रोव्हाइडर कंपनी जिओचे देशभरात कोट्यवधी युजर्स आहेत. जिओने खूपच कमी कालावधीत ग्राहकांना सुरुवातीला फ्री आणि खूपच कमी किंमतीत डेटा उपलब्ध करून हे स्थान मिळवले आहे. ज्या कंपन्या मार्केटमधी आधीपासून होत्या परंतु, त्यांना हे करणे शक्य झाले नाही. जिओकडे असे अनेक प्लान आहेत. ज्यात अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेटा बेनिफिट मिळतो. आज आम्ही तुम्हाला जिओच्या सर्वात स्वस्त प्लान संबंधी माहिती देत आहोत. जर तुम्हाला कमी किंमतीत जबरदस्त प्लान हवा असेल तर तुम्ही जिओच्या महिन्याला १२९९ रुपयांच्या रिचार्ज प्लानला पाहू शकता. जिओच्या या प्लानची वैधता ३३६ दिवसांची आहे.

वाचाः

जिओचा १२९९ रुपयांचा रिचार्ज प्लान
जिओचा १२९९ रुपयांच्या प्लानची वैधता ३३६ दिवसांची आहे. यात महिन्याला केवळ १०८.२५ रुपये खर्च येतो. हा रिचार्ज एकदाच करावा लागतो. यात तुम्हाला संपूर्ण वर्षभराची वैधता मिळते. महिन्याला रिचार्ज करणाऱ्या सर्व प्लानपेक्षा स्वस्त प्लान ठरतो. या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लानमध्ये एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. युजर्स आपल्या कॉलिंगच्या प्लानच्या शोधात असेल तर त्यांना हा प्लान चांगला आहे. कारण यात, अनलिमिटेड कॉलिंग दिली आहे. तसेच डेटा सुद्धा मिळत आहे. परंतु, जर मेसेजचा विचार केला तर या प्लानमध्ये ३६०० एसएमएस दिले जातात. याशिवाय, या रिचार्चमध्ये जिओच्या सर्व अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते.

वाचाः

जिओचा १४९ रुपयांचा रिचार्ज प्लान
जिओचा सर्वात स्वस्त प्लानमध्ये जिओचा १४९ रुपयांचा प्लानचा समावेश आहे. या प्लानची वैधता २४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. डेटा बेनिफिट मध्ये रोज १ जीबी डेटा दिला जातो. म्हणजेच एकूण २४ जीबी डेटा दिला जातो. या हिशोबाप्रमाणे एकूण १२९९ रुयपांच्या प्लानच्या तुलनेत ४० रुपयांची बचत करता येऊ शकते.

वाचाः

जिओचा ३२९ रुपयांचा रिचार्ज प्लान
जिओचा ३२९ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. या प्लानची वैधथा ८४ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण ६ जीबी डेटा दिला जातो.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here