म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत तोतया व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी एक ॲप तयार करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून रोजचे शेतमालाचे बाजार भावदेखील क्षणार्धात समजणार आहेत.

वाचाः

शनिवारी संचालक मंडळाच्या उपस्थितीत सभापती देवीदास पिंगळे यांच्या हस्ते या ॲपचे उद्घाटन करण्यात आले. उपसभापती रवींद्र भोये, दिलीप थेटे, तुकाराम पेखळे, संपतराव सकाळे आदी उपस्थित होते.

वाचाः

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्या, कांदा, बटाटा, लसूण व फळ घेऊन शेतकरी येतात. त्यांची सुरक्षितता वाढावी व त्यांची बाजार समिती आवाराबाहेर होणारी फसवणूक होऊ नये, यासाठी सभापती पिंगळे यांच्या संकल्पनेतून समितीने ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. ‘स्टॅटिक जीएसएम’चे संचालक गौरव मुंगसे यांनी हे ऍप तयार केले आहे. यात बाजार समिती आवारात शेतमालाचा बाजारभाव दोन सत्रात प्रसिद्ध केला जाईल. जेणेकरून ज्या शेतकऱ्यांस शेतमालास मिळालेला बाजारभाव माहिती होइल.

वाचाः

शेतकऱ्याला करता येणार तक्रार

नाशिक बाजार समितीत येणाऱ्या शेतकऱ्यास कुठल्याही प्रसंगाला सामोरे जावे लागू नये. तसेच आवारात लिलाव प्रक्रियेदरम्यान, व्यापारी, आडते, हमाल किंवा अन्य कुणाकडून काही अडचण भासल्यास संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांशी या अॅपच्या माध्यमातून संपर्क साधता येणार आहे. तसेच बाजार समितीस कळवूनही वेळीच मदत मिळत नसेल, तर शेतकरी या अॅपच्या माध्यमातून थेट सभापती, संचालक मंडळाशी संपर्क साधता येणार आहे.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here