नवी दिल्लीः सॅमसंगने आपला नवीन बजेट स्मार्टफोन Galaxy A12 ला लाँच केले आहे. हा फोन सध्या दक्षिण कोरियात लाँच करण्यात आला आहे. लवकरच या फोनला भारतात लाँच केले जाऊ शकते. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची दक्षिण कोरियात KRW 275,000 (जवळपास १८ हजार रुपये) किंमत आहे. भारतात कंपनी या फोनला आणखी कमी किंमतीत लाँच करू शकते.

वाचाः

चे फीचर्स
या फोनमध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस इनफिनिटी V TFT एलसीडी पॅनल दिला आहे. ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल स्टोरेजच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून मीडियाटेक हीलियो पी ३५ चिपसेट दिला आहे. काही देशात सॅमसंगने या फोनच्या ४ जीबी प्लस ६४ जीबी आणि ६ जीबी प्लस १२८ जीबी व्हेरियंटमध्येही लाँच केले आहे. फोनला मायक्रोएसडी कार्डचा सपोर्ट दिला आहे. याचे स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.

वाचाः

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये चार रियर कॅमेरे दिले आहेत. यात ४८ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्ससोबत एक ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल आणि दोन २ मेगापिक्सलचे कॅमेरे दिले आहेत. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh बॅटरी दिली आहे. १५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी फोनमध्ये ड्यूल सिम ४जी शिवाय वाय फाय 2.4Ghz, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक, साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि यूएसबी टाइप-C यासारखे ऑप्शन दिले आहेत.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here