म. टा. प्रतिनिधी, पुणे

लँडलाइन कनेक्शनवरून मोबाइलवर फोन करण्यासाठी आधी डायल करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक लँडलाइन फोनधारकांसाठी ही डोकेदुखी ठरत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. ‘शून्य’ डायल केल्यानंतरही फोन कनेक्ट होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत असून, या व्यवस्थेत तातडीने सुधारणा करण्याची मागणी भारत संचार निगम लिमिटेडकडे (बीएसएनएल) करण्यात आली आहे.

वाचाः

पुण्यातील अनेक नागरिकांनी याबाबत तक्रारी नोंदवल्या आहेत. जानेवारी २०२१पासून लँडलाइन फोनवरून मोबाइल क्रमांकास कॉल करायचा असल्यास शून्य डायल करणे बंधनकारक करण्यात आले आहे. संपूर्ण देशभरात ही प्रक्रिया राबवण्यात आली आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून यामध्ये अडथळे येत असल्याचे पुण्यातील नागरिकांचे म्हणणे आहे. विशेषत: लँडलाइन सातत्याने वापरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी या संदर्भात तक्रारी केल्या आहेत.

वाचाः

सध्या लँडलाइन क्रमांकावरून मोबाइलवर कॉल करताना ‘शून्य’ क्रमांक डायल केला नाही, तर एक रेकॉर्डिंग वाजते. त्यावर शून्य डायल करण्यासंदर्भात सूचना केल्या जातात. त्यानंतरही शून्य डायल करून कॉल केला, तर एंगेज टोन वाजत राहतो, असे नागरिकांनी सांगितले. हाच कॉल मोबाइलवरून केला असता त्यामध्ये अडथळे येत नाहीत. यामुळे ही प्रणाली राबवताना त्रुटी जाणवत असून, ‘बीएसएनएल’ने त्यासंबंधी त्वरीत कार्यवाही करण्याची अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

वाचाः

‘शून्य’ डायल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरळीतपणे सुरू आहे. सगळ्याच भागात यामध्ये अडथळे येत नाहीत. काही विशिष्ट भागांत ही समस्या होत असेल, तर त्याचा शोध घेऊन त्या संदर्भात तातडीने कार्यवाही केली जाईल. यासाठी नागरिकांनी आपल्या ग्राहक सेवा केंद्राला संपर्क साधून तक्रार करणे गरजेचे आहे.

– जनसंपर्क अधिकारी, ‘बीएसएनएल’

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here