नवी दिल्लीः गेमिंग चाहत्यांसाठी आसुस लवकरच एक जबरदस्त स्मार्टफोन आणणार आहे. कंपनी ROG Phone 5 स्मार्टफोन लाँचिंगची तयारी करीत आहे. या फोनला चीनच्या TENAA आणि 3C सर्टिफिकेशन वेबसाइट वर पाहिले गेले आहे. आता गीकबेंचच्या डेटाबेस मध्ये पाहिले गेले आहे. कंपनी लाँचिंग आधी या फोनची टेस्टिंग करीत आहे.

वाचाः

स्नॅपड्रॅगन 888 SoC प्रोसेसर मिळू शकतो
गीकबेंचवर आसूसचा हा फोन मॉडल नंबर ASUS_I005DA वर लिस्ट करण्यात आला आहे. फोनला १६ जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन ८८८ एसओसी प्रोसेसर देण्यात येणार आहे. हा फोन अँड्रॉयड ११ ओएसवर काम करतो. गीकबेंचचे सिंगल कोर टेस्टमध्ये या फोनला ११२५ आणि मल्टि कोर टेस्टमध्ये ३७१४ गुण मिळाले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर मध्ये या फोनला ८ जीबी रॅम व्हेरियंटला गीकबेंच वर पाहिले गेले आहे.

वाचाः

65 वॉट चार्जिंग आणि 6000mAh बॅटरी
TENAA लिस्टिंग च्या माहितीनुसार, या फोनमध्ये ६.७८ इंचाचा हाय रिफ्रेश रेटचा ओलेड डिस्प्ले मिळू शकतो. फोनमध्ये 6000mAh ची ड्यूल बॅटरी दिली गेली आहे. ३सी लिस्टिंग नुसार, हा फोन ६५ वॉट ची फास्ट रॅपिड चार्जिंग सोबत येणार आहे.

फोनच्या बॅकला एक सेकंडरी कॅमेरा
ROG Phone 5 चा जो फोटो समोर आला आहे. त्यानुसार, फोनच्या बॅकमध्ये एक सेकंडरी डिस्प्ले सुद्धा दिला आहे. यासोबतच आसूसने युजर्संना जबरदस्त गेमिंग अनुभव मिळावा यासाठी टेनसेंड गेम्स सोबत पार्टनरशीप केली आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा कॅमेराचा ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे.

वाचाः

या महिन्यात होऊ शकतो लाँच
फोनला कंपनी कधीपर्यंत लाँच करू शकते यासंबंधी अद्याप काही सांगितले गेले नाही. परंतु, अवफाच्या माहितीनुसार हा फोन चीनमध्ये १२ फेब्रुवारीला लाँच केला जाऊ शकतो.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here