नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी बीएनएनएल च्या १०९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज मध्ये डबल डेटा बेनिफिट दिला जात आहे. या प्लानला Mithram Plus प्लान म्हणूनही ओळखले जाते. हा बीएसएनएलचा प्लान एक वैधता एक्सटेंशन रिचार्ज आहे. हा अशा लोकांसाठी आहे. जे बीएसएनएल प्रीपेड नंबर अकाउंटला अॅक्टिव ठेऊ इच्छितात. या प्लानला सर्वात आधी डिसेंबर २०१९ मध्ये ५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट सोबत लाँच करण्यात आले होते. परंतु, आता या प्लानमध्ये १० जीबी डेटा मिळतो.

वाचाः

BSNLच्या १०९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणारे फायदे
१०९ रुपयांच्या बीएसएनएल प्लानमध्ये २० दिवासांसाठी कोणत्याही एफयूपी लिमिट अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग ऑफर दिली जाते. याशिवाय, १० जीबी डेटा दिला जातो. या प्लानचे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे याची वैधता ७५ दिवसांची आहे. हे अशा ग्राहकांसाठी खास आहे. जे बीएसएनएलचा प्रीपेड नंबर केवळ अॅक्टिव ठेऊ इच्छितात. हे सर्व नवीन फायदे ३१ मार्च २०२१ पर्यंत वैध असणार आहेत.

वााचाः

TelecomTalk ने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले की, केरळ टेलिकॉम सर्कलमध्ये १०९ रुपयांचा प्लान नवीन फायद्यासोबत उपलब्ध आहे. Kerala telecom ने ही माहिती दिली आहे. बीएसएनएल १ एप्रिल पासून १०९ रुपयांचा रिचार्ज बंद करीत आहे. या प्लानला डिसेंबर २०१९ मध्ये लाँच करण्यात आले होते. त्यावेळी या प्लानची वैधता ९० दिवसांची होती.

वाचाः

बीएसएनएल कंपनी या प्लानला बंद का करीत आहे. हे अद्याप स्पष्ट नाही. परंतु, बीएसएनएल आपल्या PV 106 किंवा PV 107 रुपयांच्या प्लानला प्रमोट करू शकते. पीव्ही १०६ मध्ये ग्राहकांना ३ जीबी डेटा, १०० मिनिट फ्री व्हाइस कॉलिंग, ६० दिवसांसाठी BSNL Tunes सब्सक्रिप्शन ऑफर केले जाऊ शकतात. या प्लानची वैधता १०० दिवसांची आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here