नवी दिल्लीः Mi 11 फ्लॅगशिप सोबत Xiaomi ने सोमवारी Mi TV Q1 75-inch ला लाँच केला आहे. क्यूएलईडी ४ के डिस्प्ले व अँड्रॉयड १० सॉफ्टवेयर दिला आहे. ही टीव्ही जबरदस्त व्हिजिबिल्टी साठी १७८ डिग्री व्यूविंग अँगल सोबत येतो. यात ७००,००० जास्त मूव्ही व शो आणि गुगल प्ले स्टोरच्या माध्यमातून ५ हजारांहून जास्त अॅप्सचे अॅक्सेस दिले आहे. या टीव्ही सोबत स्मार्ट रिमोट येते. ज्यात Netflix आणि Amazon Prime Video चे बटन दिले आहे. याशिवाय यात Google Assistant आणि Amazon Alexa सारखे व्हाइस असिस्टेंट दिले आहेत.

वाचाः

टीव्हीची किंमत
नवीन Mi TV Q1 75-inch टीव्हीची किंमत जवळपास १ लाख १४ हजार ३०० रुपये आहे. ही टीव्ही मार्च २०२१ पासून बाजारात उपलब्ध केली जाणार आहे. सुरुवातीला काही निवडक ठिकाणी याची विक्री केली जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सेलच्या पहिल्या दिवशी या टीव्हीची किंमत ८७ हजार ९०० रुपये राहणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.

वाचाः

टीव्हीचे फीचर्स
Mi TV Q1 75-inch टीव्हीमध्ये क्यूएलईडी 4के यूएचडी (3,840×2,160 पिक्सल) रिजॉल्यूशन डिस्प्ले सोबत क्वांटम डॉट टेक्नोलॉजी दिली आहे. ही टीव्ही १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट, रेजर-थिन बेजल्स, १०० टक्के एनटीएससी रेंज सोबत १.०७ बिलियन कलर्स व्हेरिएशन, १०२४ वेगवेगळे कलर शेड्स आणि 10,000: 1 कॉन्ट्रास्ट रेशियो सोबत येईल. टीव्हीत १९२ झोनेच फुले डायनामिक लोकल डिमिंग डॉल्बी व्हिजन आणि एचडीआर 10+ सपोर्ट देण्यात आला आहे. जबरदस्त व्ह्यूविंग क्षमतेसाठी डिस्प्लेत १७८ डिग्री व्यूविंग अँगल दिला आहे.

वाचाः

या टीव्हीत ३० वॉट स्टिरियो स्पीकर सिस्टम दिला आहे. ज्यात सहा स्पीकर्स दिले आहेत. यात डॉल्बी ऑडियो आणि डीटीएस-एचडी सपोर्टचा समावेश आहे. याशिवाय 105 गीगाहर्ट्ज़ मीडियाटेक MT9611 प्रोसेसर दिला आहे. ज्यात २ जीबी रॅम प्लस ३ जीबी स्टोरेज दिला आहे. हे अँड्रॉयड १० सॉफ्टवेयरवर काम करते. ज्यात Netflix, Amazon Prime Video आणि YouTubeचा समावेश आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here