२०२० वर्षात स्मार्टफोन मेकर कंपन्यांनी वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता २०२१ या वर्षाला सुरुवात झाली आहे. स्मार्टफोन कंपन्या या वर्षी सुद्धा एका पेक्षा एक वरचढ स्मार्टफोन लाँच करणार आहेत. तुम्ही जर नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लान करीत असाल तर या आठवड्यात एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच होणार आहेत. भारतीय बाजारात शाओमी, नोकिया आणि इनफिनिक्स कंपनीचे स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहेत. हे स्मार्टफोन भारतात लाँचिंग साठी तयार आहेत. तर काही ग्लोबली लाँच करण्यात येणार आहेत. आम्ही पाच अशा स्मार्टफोनची यादी बनवली आहे. जी या आठवड्यात लाँच करण्यात येणार आहेत. जाणून घ्या या पाच स्मार्टफोन विषयी. या फोनची किंमत त्यांची खास फीचर्स आणि फोटो संबंधीची खास माहिती जाणून घ्या…

'या' आठवड्यात लाँच होणार शाओमी, नोकिया आणि इनफिनिक्सचे 'हे' पाच स्मार्टफोन, जाणून घ्या डिटेल्स

२०२० वर्षात स्मार्टफोन मेकर कंपन्यांनी वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे स्मार्टफोन लाँच केले आहेत. आता २०२१ या वर्षाला सुरुवात झाली आहे. स्मार्टफोन कंपन्या या वर्षी सुद्धा एका पेक्षा एक वरचढ स्मार्टफोन लाँच करणार आहेत. तुम्ही जर नवा स्मार्टफोन खरेदी करण्याचा प्लान करीत असाल तर या आठवड्यात एकापेक्षा एक जबरदस्त स्मार्टफोन लाँच होणार आहेत. भारतीय बाजारात शाओमी, नोकिया आणि इनफिनिक्स कंपनीचे स्मार्टफोन लाँच करण्यात येणार आहेत. हे स्मार्टफोन भारतात लाँचिंग साठी तयार आहेत. तर काही ग्लोबली लाँच करण्यात येणार आहेत. आम्ही पाच अशा स्मार्टफोनची यादी बनवली आहे. जी या आठवड्यात लाँच करण्यात येणार आहेत. जाणून घ्या या पाच स्मार्टफोन विषयी. या फोनची किंमत त्यांची खास फीचर्स आणि फोटो संबंधीची खास माहिती जाणून घ्या…

​Xiaomi Mi 11
​Xiaomi Mi 11

Xiaomi Mi 11

शाओमीने ८ फेब्रुवारी रोजी आपला लेटेस्टे स्मार्टफोन मी ११ ला ग्लोबली लाँच केले आहे. या फोनमध्ये ६.८१ इंचाचा २ के अमोलेड डिस्प्ले दिला आहे. हा फोन अँड्रॉयड १० ओएस बेस्ड MIUI 12 वर काम करतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसर सोबत १०८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये पॉवर देण्यासाठी यात 4600 बॅटरी दिली आहे. टर्बोचार्ज्ड ५५ वॉट वायर्ड आणि ५० वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. या फोनला १२८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये लाँच केले आहे. या फोनची किंमत ७० हजार १०० रुपये ठेवली आहे.

​नोकिया ५.४
​नोकिया ५.४

नोकिया ५.४

नोकिया पुन्हा एकदा भारतात आपला नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनी या फोनला १० फेब्रुवारी रोजी लाँच करणार आहे. या फोनला ग्लोबली मार्केटमध्ये आधीच लाँच करण्यात आले आहे. या फोनमध्ये ६.३९ इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. फोन अँड्ऱॉयड १० ओएसवर काम करतो. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६६२ प्रोसेसर मिळणार आहे. ज्याला ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज सोबत लाँच केले जाऊ शकते. फोटोग्राफीसाठी यात चार रियर कॅमेरे दिले जाणार आहे. ज्यात मेन कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा लेन्स मिळणार आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. या फोनची संभावित किंमत १६ हजार ९०० रुपये असू शकते.

​नोकिया ३.४
​नोकिया ३.४

नोकिया ३.४

नोकिया ५.४ सोबत कंपनी स्वस्त किंमतीचे मॉडल लाँच करणार आहे. नोकिया ३.४ ला लाँच करु शकते. यात ६.३९ इंचाचा एचडी डिस्प्ले मिळणार आहे. फोन अँड्रॉयड १० ओएस वर काम करू शकतो. मल्टिटास्किंग साठी स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर स्नॅपड्रॅगन ४६० प्रोसेसर मिळणार आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी पर्यंत स्टोरेज दिला जाणार आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये तीन रियर कॅमेरे दिले जाणार आहेत. यात १३ मेगापिक्सलचा मेन सेन्सर, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा लेन्स मिळणार आहे. स्मार्टफोनची संभावित किंमत ११ हजार ९९९ रुपये असू शकते.

​इंफिनिक्स स्मार्ट 5
​इंफिनिक्स स्मार्ट 5

इंफिनिक्स स्मार्ट 5

इंफिनिक्स आपला लेटेस्ट स्मार्टफोन ‘स्मार्ट 5’ ११ फेब्रुवारी रोजी भारतात लाँच करणार आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या फोनमध्ये ६.६ इंचाचा वॉटरड्रॉव डिस्प्ले दिला जाणार आहे. हा फोन अँड्रॉयड १० गो एडिशनवर काम करणार आहे. फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर मिळणार आहे. या फोनमध्ये ३ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज दिला जाणार आहे. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येऊ शकते.

​इंफिनिक्स स्मार्ट 5
​इंफिनिक्स स्मार्ट 5

इंफिनिक्स स्मार्ट 5

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये दोन रियर कॅमेरे दिले जाणार आहेत. ज्यात १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला जाणार आहे. सेल्फीसाठी यात ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जाणार आहे. हा फोन कंपनीचा सर्वात स्वस्त फोन असणार आहे. या फोनची किंमत ८ हजार रुपये असू शकते. या फोनला एक्सक्लूसिव म्हणून फ्लिपकार्टवर विकले जाणार आहे.

​रेडमी K40 प्रो
​रेडमी K40 प्रो

रेडमी K40 प्रो

चिनी कंपनी शाओमी आपला नवा स्मार्टफोन सीरीज १४ फेब्रुवारी रोजी लाँच करणार आहे. रेडमी K40 प्रो स्मार्टफोनला या दिवशी लाँच केले जाऊ शकते. या सीरीजमध्ये रेडमी K40, रेडमी K40S सोबत टॉप व्हेरिएंट रेडमी K40 प्रो चा समावेश आहे. रेडमी K40 सीरीज च्या खास फीचर्समध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८७० आणि मीडियाटेक डायमेंसिटी १२०० प्रोसेसर सोबत लाँच केला जाऊ शकतो.

​रेडमी K40 प्रो
​रेडमी K40 प्रो

रेडमी K40 प्रो

रेडमी के ४० प्रोमध्ये फोटोग्राफीसाठी १०८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला जाऊ शकतो. या फोनला ६ जीबी रॅम मध्ये लाँच केले जाऊ शकते. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. सेल्फीसाठी यात २० मेगापिक्सलचा आणि २ मेगापिक्सलचा ड्यूल फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे. स्मार्टफोनमध्ये ४८०० एमएएच क्षमतेची बॅटरी मिळू शकते. या फोनची सुरुवातीची किंमत ३४ हजार ९९९ रुपये असू शकते.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here