वृत्तसंस्था, नवी दिल्ली

येत्या दोन ते तीन महिन्यांत बहुचर्चित ‘’ तंत्रज्ञानाची चाचणी सुरू होण्याची शक्यता असून, दूरसंचार विभागाकडे १६ अर्ज दाखल झाले आहेत. चाचणीसाठी स्वदेशी आणि आयात तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जाणार असल्याचे दूरसंचार विभागातर्फे मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. संसदेच्या स्थायी समितीसमोर सोमवारी सादर झालेल्या अहवालात ‘फाइव्ह जी’ सेवेला होत असलेल्या विलंबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. अन्य देशांमध्ये ‘फाइव्ह जी’ नेटवर्कवर आधारित सेवेची सुरुवात झाली असून, भारतातच उशीर का याबाबत ताशेरे ओढण्यात आले होते.

वाचाः

दूरसंचार मंत्रालयाने यापूर्वीच एक मार्च २०२१ रोजी स्पेक्ट्रमच्या लिलावांची घोषणा केली आहे. या लिलावांतून ३.९२ लाख कोटी रुपये केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहेत. मात्र, त्यामध्ये ‘फाइव्ह जी’शी संबंधित स्पेक्ट्रमचा समावेश करण्यात आलेला नाही. दूरसंचार विभागाने संसदेच्या समितीला दिलेल्या माहितीनुसार ‘फाइव्ह जी’ सेवेची सुरुवात चालू वर्षाच्या अखेरीस अथवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला ही सेवा काही विशिष्ट क्षेत्रांसाठीच असेल. देशामध्ये ‘फोर जी’ सेवेच्या विस्तारासाठी पाच ते सहा वर्षांचा अवधी लागला होता.

अमेरिकी कंपनी ‘क्वालकॉम’सह ‘रिलायन्स जिओ’ने अमेरिकेत ‘फाइव्ह जी’ सेवेची यशस्वी चाचणी घेतली आहे. ‘जिओ’चे अध्यक्ष मॅथ्यू ओमान यांनी दिलेल्या माहितीनुसार क्वालकॉम आणि ‘रिलायन्स’ची उपकंपनी ‘रेडिसीस’ ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानावर काम करीत असून, लवकरच ही सेवा सादर करण्यात येणार आहे. जिओ आणि क्वालकॉमने जाहीर केल्यानुसार फाइव्ह जीएनआर सोल्युशन्स’ आणि ‘क्वालकॉम फाइव्ह जी आरएएन’ प्लॅटफॉर्मवर एक जीबीपीएसपेक्षा अधिक वेग प्राप्त करण्यात यश आले आहे. सध्या अमेरिका, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रोलिया, स्वित्झर्लंड आणि जर्मनी आदी देशांतील ग्राहकांना एक जीबीपीएस वेगाने इंटरनेटची सुविधा उपलब्ध झाली आहे.

वाचाः

जुलैपासून ‘जिओ’ची सेवा

‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी ‘इंडियन मोबाइल काँग्रेस २०२०’मध्ये देशात ‘फाइव्ह जी’ सेवेची सुरुवात करण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. देशाची डिजिटल वाटचाल सुरू राहण्यासाठी, ‘फाइव्ह जी’ची सेवा सुरू होण्यासाठी तसेच ही सेवा किफायतशीर दरांमध्ये उपलब्ध होण्यासाठी पावले उचलण्याचे आवाहनही केले होते. जिओतर्फे साधारणत: चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत (जुलै ते डिसेंबर) ‘फाइव्ह जी’ची सेवा सुरू करण्याचे संकेतही अंबानी यांनी दिले होते. स्वदेशात विकसित केलेले हे तंत्रज्ञान असून, हार्डवेअरही भारतीयच असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

या देशांमध्ये सेवेची सुरुवात

दक्षिण कोरिया, चीन आणि अमेरिकेमध्ये सर्वप्रथम ‘फाइव्ह जी’ सेवेची सुरुवात झाली. भारतात ‘फाइव्ह जी’ सेवेच्या चाचणीला मुहूर्त लागला नसला तरी, जगभरातील ६८ देशांमध्ये यापूर्वीच ही सेवा सुरू झाली आहे. ही सेवा श्रीलंका, ओमान, फिलिपिन्स आणि न्यूझीलंडसारख्या छोटे देशांतही सुरू झाली आहे.

किती वेग मिळणार?

‘फोर जी’च्या तुलनेत ‘फाइव्ह जी’ सेवेचा वेग कैकपटीने अधिक आहे. इंटरनेट सेवेचा वेग मोजणाऱ्या ‘ओपनसिग्नल’ने नुकतीच ‘फाइव्ह जी’ नेटवर्कशी संबंधित अहवाल सादर केला. त्यानुसार जगातील सर्वाधिक वेगवान ‘फाइव्ह जी’ सौदी अरबमध्ये कार्यरत आहे. तेथील ‘फाइव्ह जी’ नेटवर्कचा सरासरी डाउनलोडचा वेग ३७७.२ एमबीपीएस आहे. तेथे ‘फोर जी’चा डाउनलोड वेग ३०.१ एमबीपीएस असून, ‘फाइव्ह जी’च्या तुलनेत १२.५ पट कमी आहे. ‘रिलायन्स जिओ’ने भारतात ‘फाइव्ह जी’ नेटवर्कवर एक जीबीपीएस वेग देण्याची घोषणाा केली आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here