नवी दिल्लीः जर तुम्ही (Paytm)चा वापर करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. मोबाइल पेमेंट अॅप पेटीएम (Paytm) ने आपल्या युजर्संसाठी एक नवीन फीचर आणले आहे. आता तुम्ही पेटीएम द्वारे आपल्या क्रेडिट कार्टवरून घर मालकाला घरभाडे दिले तर यावर कंपनी १ हजार रुपयांचा कॅशबॅक देणार आहे. तुमच्या क्रेडिट कार्डवरून थेट घरभाडे घर मालकाच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. पेटीएम वर यूपीआय (UPI), डेबिट कार्ड (Debit Card) आणि नेटबँकिंग (Net banking) ची सुविधा आहे.

वाचाः

हे फायदे मिळणार
Paytm आपल्या प्लॅटफॉर्मवर रेंट देण्यासाठी युजर्संना ट्रांझॅक्शन केल्यानंतर १ हजार रुपयांचा कॅशबॅक देत आहे. क्रेडिट कार्डवरून रेंट पे करणाऱ्या युजर्संना हा फायदा मिळू शकणार आहे. युजर आपली क्रेडिट लिमिटचा वापर करून कॅश वाचवू शकणार आहे. क्रेडिट कार्डवरून पेमेंट केल्यास ते पेमेंट ४५ ते ५० दिवसांनंतर द्यायचे असतात. तसेच क्रेडिट कार्डद्वारे करण्यात आलेल्या ट्रान्झॅक्शन ला तुम्ही ईएमआय मध्ये कन्वर्ट करू शकता. तसेच युजर्सला पेमेंट वर क्रेडिट कार्ड प्वॉइंट्स मिळू शकतील.

वाचाः

असे होणार क्रेडिटवरून पेमेंट
Paytm द्वारे घर मालकाला रेंट देण्यासाठी युजर्संना सर्वात आधी ‘रिचार्ज एंड पे बिल्स’ सेक्शन मध्ये जाऊन ‘रेंट पेमेंट’ चा ऑप्शन सिलेक्ट करावा लागणार आहे. रिचार्ज अँड पे ऑप्शन तुम्हाला पेटीएमच्या होम स्क्रीनवर मिळेल. यानंतर घर मालकाचा अकाउंट नंबर आणि आपल्या क्रेडिट कार्डची सविस्तर माहिती टाकून तुम्ही तुमचे घर भाडे पे करू शकता. Paytm चा इनोवेटि डॅशबोर्ड तुमच्या सर्व रेंट पेमेंटला ट्रॅक करण्यास मदत करणार आहे. तेसच पेमेंट ड्यू रेट रिमाइंड सुद्धा करू शकेल.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here