डिसेंबर २०१९ मध्ये टिकटॉक चे महिन्याला अॅक्टिव युजर्सची संख्या ८१ मिलियन झाली आहे. डिसेंबर २०१८ च्या तुलनेत ही ९० टक्के वाढली आहे. टिकटॉक हे चीननंतर सर्वात जास्त भारतात पाहिले जाते. २०१९ मध्ये फेसबुकवर भारतीय लोकांनी २५.५ अब्ज तास घालवले आहेत. याआधी ही केवळ १५ टक्के वाढ होती. तसेच डिसेंबर २०१९ मध्ये महिन्याला अॅक्टिव युजर्सची संख्या सुद्धा १५ टक्के वाढ झाली आहे. एकूण वेळापैकी TikTok जरी फेसबुकपेक्षा पाठीमागे असेल. परंतु, एक वर्षाआधीच्या तुलनेत यात प्रचंड वाढ झाली आहे. टिकटॉक अॅप सप्टेंबर २०१७ मध्ये लाँच करण्यात आले होते. जगभरातील सर्वात मौल्यवान स्टार्टअप कंपनी ByteDance टिकटॉकची पॅरंट कंपनी आहे. भारतीय युजर्स टिकटॉकवर २०१८ च्या तुलनेत ६ पट अधिक वाढले आहे. टिकटॉकवर भारतीय अधिक वेळ खर्च करीत आहेत. २०१९ मध्ये भारतीयांनी ५.५ अब्ज तास टिकटॉकवर खर्च केले आहेत. मोबाइल आणि डेटा अॅनालिटिक्स फर्म App Annie च्या माहितीनुसार, अँड्रॉयड युजर्सने २०१८ मध्ये एकूण ९०० मिलियन (९ कोटी) तास TikTokवर घालवले आहे. टिकटॉकने सध्या प्रतिस्पर्धी
ला मागे टाकले आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times