वाचाः
पीयूष गोयल यांच्या ट्विटवरून चर्चा
Koo App ची सध्या जोरात सुरू आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून सांगितले की, त्यांनी Homegrown microblogging platform Koo जॉइन केले आहे. काही वेळेआदी ट्विटर आणि भारत सरकार यांच्यात काही ट्विटवरून वाद उभा राहिला आहे. त्यामुळे असा प्रयत्न केला जात आहे की, जितके प्रसिद्ध अॅप असतील त्यांच्याकडे सध्या लक्ष वेधून घेतले पाहिजे. आता Koo App वर पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत लोकांचे लक्ष वेधले जात आहेत. Koo App अॅपला डेव्हलपर्सने iOS आणि Android प्लॅटफॉर्मवर लाइव्ह करण्यात आले आहे. या अॅपची वेबसाइट सुद्धा आहे.
वाचाः
असे करा डाउनलोड
Koo App एकदम फ्री आहे. याला गुगल प्ले स्टोरवरून तसेच अॅपल अॅप स्टोरवरून फ्री मध्ये डाउनलोड करू शकता. कू अॅप ला डाउलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोरवर सर्च करा. सर्च करताना आपल्याला सुरुवातीला ‘Koo: Connect with Indians in Indian Languages’दिसेल. याला Bombinate Technologies Private Limited द्वारा डेव्हलप करण्यात आले आहे. डाउनलोड करताना हे वाचा.
वाचाः
काय आहेत फीचर्स
हे अॅप जवळजवळ ट्विटर सारखेच आहेत. ज्यात तुम्ही कुणालाही फॉलो करू शकता. तुम्हालाही कुणीही फॉलो करू शकते. यात मेसेज लिहून शेयर करू शकता. तुमच्याकडे फोटो-व्हिडिओ शेयर करण्याचा ऑप्शन असणार आहे. सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे कू अॅप मध्ये इंग्रजी सोबत कन्नड, तमिळ, तेलुगु भाषेचा सपोर्ट करते. तसेच युजर्स आपल्या भाषेत लिहून याला शेयर करू शकते. या अॅपवर ४०० शब्दांपर्यंत लिहू शकतात.
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times