हॅकर्संनी बनावट लिंक तयार केल्या आहेत. या लिंक उघडल्यास मोबाइलमधील तुमचा खासगी डेटा चोरी केला जाऊ शकतो. या लिंक्स कोडसह तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक जणांची यात फसवणूक होत आहे. संदर्भातील बनावट फोटो, व्हिडिओ या पोस्ट खऱ्या आहेत असे वाटावे यासाठी ते युजर्संना PDF आणि MP4 यासारख्या प्रसिद्ध फॉरमॅट्चा वापर करीत आहेत. या फाइल्सला क्लिक केल्यानंतर आणि डाउनलोड केल्यानंतर हॅकर्स तुमची माहिती चोरी करू शकतात. फेसबुक, ट्विटर आणि गुगलने या सायबर क्राइमच्या बचावासाठी अनेक उपाय केले आहेत. परंतु, हॅकर्सने नवीन-नवीन पद्धतीने सिक्युरिटी बायपास वर इंटरनेट युजर्सला नुकसान पोहोचवत आहेत. Kaspersky च्या एका अॅनालिस्ट ने यासंबंधी सांगितले की, करोना व्हायरसने सध्या धुमाकूळ घातला आहे.
करोना व्हायरसची माहिती मिळावी यासाठी अनेक जण या लिंक ओपन करीत असतात. याचा फायदा हॅकर्सने घेतला आहे. आतापर्यंत १० फाइल्समधून डेटा चोरीचे काम हॅकर्सकडून करण्यात आल्याचे एका जाणकाराने सांगितले. करोना व्हायरसची भीती पसरली आहे. ती जाणून घेण्यासाठी अनेक जण उत्सूक आहेत. त्यामुळे कोणतीही लिंक उघडण्यापूर्वी ती तपासावी असे जाणकारांनी सांगितले.
अशी ओळखा बनावट लिंक
बनावट लिंक ओळखण्यासाठी काही खास गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे. जर लिंकमध्ये शेवटी .docx, .pdf किंवा .mp4 असे असेल तर ही लिंक बनावट आहे. तसेच .exe किंवा .Ink या फॉर्मेट्समध्ये लिंक असेल तर युजर्संना सावध राहण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून चीनमध्ये आतापर्यंत २१३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच जवळपास १० हजार लोकांना याची लागण झाली आहे. या आजारावर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने तो जीवघेणा ठरत आहे.
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times