नवी दिल्लीः लोकप्रिय मेसेजिंग अॅप प्लॅटफॉर्म आपल्या युजर्संना चांगला अनुभव देण्यासाठी अनेक नवीन फीचर्स आणत आहे. कंपनी सध्या अनेक फीचर्सवर काम करीत आहे. यापैकी एक फीचर म्हणजे मल्टी डिव्हाइस होय. या फीचर अंतर्गत एकाच अकाउंटला अनेक डिव्हाइस म्हणजे अनेक ठिकाणी अॅक्सेस मिळणार आहे. या फीचरची अनेकांना फार उत्सूकता आहे.

वाचाः

हे फीचर एकाचवेळी अनेक डिव्हाइसेजवर एक अकाउंटचा वापर करण्यास मदत करू शकणार आहे. या मल्टी डिव्हाइस सपोर्टचा एक भाग एक फीचर रुपात स्पॉट करण्यात आले आहे. WABetaInfo च्या माहितीनुसार, iOS साठी WhatsApp बीटा 2.21.30.16 मध्ये एक लॉगआउट फीचर दिसले आहे. हे फीचर मल्टी डिव्हाइस सपोर्टचा भाग असणार आहे. या द्वारे एक व्यक्ती विविध ठिकाणी कनेक्टेड डिव्हाइसशी लॉग आउट करू शकणार आहे. यात नवीन सर्विसवरून एक व्हिडिओ डेमो दाखवला आहे. हे लिंक्ड डिव्हाइस इंटरफेस मध्ये देण्यात आलेल्या डिलीट अकाउंट पर्यायाला रिप्लेस करू शकतो. युजर्सला हे फीचर खूप पसंत पडू शकते.

वाचाः

असे फीचर काम
करणार
या फीचरचा वापर करण्यासाठी ही सर्विस युजर्संला त्यांच्या अकाउंटला दुसऱ्या डिव्हाइसला लॉग आउट करण्यास मदत करू शकणार आहे. रिपोर्टमध्ये सांगितले की, एकाच अकाउंटला ४ वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये अॅक्सेस केला जाऊ शकतो. ही मर्यादा पुढे जाऊन कमी होऊ किंवा वाढू शकते. या फीचरसाठी प्रायमरी डिव्हाइसवर इंटरनेट कनेक्शनची गरज नसणार आहे. त्यामुळे लॉग आउट फीचर द्वारे युजर्स अकाउंटला वेगवेगळ्या डिव्हाइसमध्ये लॉगआउट करु शकतील.

वाचाः

रिपोर्टमध्ये हेही सांगितले की, हे फीचर कोणत्याही अडचणीविना WhatsApp आणि WhatsApp Business अकाउंटमध्ये कार करीत आहे. याला WhatsApp च्या iOS बीटा व्हर्जनवर उपलब्ध करण्यात आले आहे. परंतु, हे आता पब्लिक बीटा व्हर्जनवर उपलब्ध नाही. याला लवकरच अँड्रॉयडच्या बीटा व्हर्जनवर उपलब्ध केले जाऊ शकते.

वाचाः

WhatsAppने सांगितले की, ते आणखी एका नवीन फीचरवर काम करीत आहे. ज्याचे नाव आहे mention badge. हे ग्रुप चॅट्स साठी आणले जाणार आहे. कंपनी लवकरच या फीचर्सला आणू शकते. आणखी एका रिपोर्ट्सनुसार, व्हॉट्सअॅप ने नवीन फीचर रोलआउट करणे सुरू केले आहे. याचे नाव म्यट व्हिडिओ आहे. या फीचर मध्ये युजर्स सेंड केल्या जाणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याकडून आवाज बंद करू शकतो. जर युजर्स व्हिडिओ म्यूट करीत असेल तर त्या व्हिडिओला पाठवण्याआधी केवळ स्पीकर आयकॉनवर टॅप करायचे आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here