नवी दिल्लीः स्मार्टफोनला लवकरच लाँच केले जाण्याची शक्यता आहे. या फोनसंबंधी अनेक लीक माहिती समोर आली आहे. नवीन गॅलेक्सी ए ५२ गेल्या वर्षी आलेल्या गॅलेक्सी ए ५१ चे अपग्रेड व्हेरियंट आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए ५२ ला नुकतेच लीक झालेल्या फोटोवरून फोनची डिझाइन आधीच्या ए ५१ सारखी असणार आहे.

वाचाः

Samsung Galaxy A52 ला 4G LTE आणि 5G वेरियंट्स मध्ये उपलब्ध करण्याची शक्यता आहे. आता सॅमसंगच्या या हँडसेटची किंमत, फीचर्स आणि लाँचिंग टाइमलाइन एक ट्विटर युजरने शेयर केली आहे. ‘CEO of Chun Corp’ नावाच्या एका युजरकडून करण्यात आलेल्या शेयरच्या माहितीनुसार, अपकमिंग सॅमसंग गॅलेक्सी ए ५२ स्मार्टफोन संबंधी काही माहिती उघड झाली आहे.

वाचाः

Samsung Galaxy A52 4G: ची किंमत आणि लाँचिंग टाइमलाइन लीक
सॅमसंग गॅलेक्सी ए ५२ ४ जी व्हेरियंटची किमत जवळवास ३० हजार रुपयांच्या जवळपास असू शकते. तर ५ जी मॉडलला ३५ हजार रुपयांच्या जवळपास लाँच केले जाऊ शकते. हँडसेटला व्हिएतनाममध्ये मार्चेच्या शेवटच्या आठवड्यात लाँच केले जाण्याची शक्यता आहे.

वाचाः

चे फीचर्स
ट्विटच्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी ए ५२ मध्ये ६.५ इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले असू शकतो. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७२० जी प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज दिला जाऊ शकतो. फोनला ६ जीबी रॅम सोबत लाँच केले जाण्याची शक्यता आहे. फोन अँड्रॉयड ११ ओएस बेस्ड OneUI 3.0 कस्टम स्किनसोबत उपलब्ध केला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी, १२ मेगापिक्सलचा सेकंडरी आणि ५ मेगापिक्सलचे दोन लेन्स दिले जाऊ शकते.

वाचाः

या फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनमध्ये २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत 4500mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. फोनला ब्लू, लेवेंडर, ब्लॅक आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध केले जाऊ शकते. या फोनमध्ये आणखी कोणते फीचर्स असू शकते याविषयी आणखी माहिती उघड करण्यात आली नाही.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here