नवी दिल्लीः सॅमसंगच्या गॅलेक्सी ए आणि एम सीरीजच्या हँडसेटवरून लागोपाठ बातम्या समोर येत आहेत. कंपनीच्या गॅलेक्सी एम ६२ स्मार्टफोनची सुद्धा जोरदार चर्चा सुरू आहे. संबंधी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात माहिती उघड झाली होती. भारतात सॅमसंगची अधिकृत वेबसाइट वर गॅलेक्सी एम ६२ चे सपोर्ट पेज लाइव्ह करण्यात आले आहे.

वाचाः

Samsung सपोर्ट पेज लाइव्ह
मल्टिपल लीक आणि सर्टिफिकेशनच्या माहितीनुसार, Samsung Galaxy M62 ला मॉडल नंबर SM-M625F सोबत लाँच केले जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोन गॅलेक्सी एफ ६२ चे रिब्रँडेड व्हेरियंट असणार आहे. गॅलेक्सी एफ ६२ चे मॉडल नंबर E625F असणार आहे. या फोनला भारतात १५ फेब्रुवारी रोजी लाँच करण्यात येणार आहे. भारतात गेल्यावर्षी आलेल्या सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१ ला ब्राझीलमध्ये गॅलेक्सी एम २१ एस म्हणून लाँच केले होते. या दोन्ही फोनमध्ये कोणताही फरक नव्हता परंतु, एम२१ एस ला भारतात लाँच करण्यात आले नाही.

वाचाः

परंतु, आता गॅलेक्सी एम६२ सपोर्ट पेज लाइव्ह करण्यात आले आहे. म्हणजेच फोनला भारतात लाँच केले जाऊ शकते. सध्या गॅलेक्सी एम ६२ ची लाँचिंगच्या तारखेची कोणतीही माहिती नाही. अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नाही.

वाचाः

Samsung Galaxy M62 ची संभावित वैशिष्ट्ये
या फोनमध्ये एक्सीनॉस ९८२५ प्रोसेसर मिळणार आहे. हँडसेटमध्ये ६ जीबी रॅम व २५६ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज दिला आहे. याशिवाय, फोनमध्ये ४जी, ड्यूल बँड वाय फाय, ब्लूटूथ ५.०, एनएफसी, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाईप सी, अँड्रॉयड ११ ओएस सारखे फीचर्स देण्यात येणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये २५ वॉट फास्ट चार्जिंग सोबत 7000mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here