नवी दिल्लीः जास्त पॉवरफुल असलेला अँड्रॉयड टॅबलेट लेनोवोने आज भारतात लाँच केला आहे. लेनोवा टॅब पी ११ प्रोस असे या टॅबलेटचे नाव असून यात अल्ट्रा स्लिम चेसिस आणि अॅल्यूमिनियम अलॉय यूनिबॉडी दिली आहे. या टॅबलेटमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० जी प्रोसेसर आणि क्विक चार्ज ३.० यासारखे जबरदस्त फीचर्स दिले आहेत. कंपनीने या टॅबलेटला भारतात ४४ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे.

वाचाः

वर कंपनीने ३० दिवसांच्या लाँचिंग ऑफरची घोषणा सुद्धा केली आहे. लाँचिंग ऑफरमध्ये हा लॅपटॉप खरेदी करणाऱ्या ग्राहकांना १० हजार रुपयांचे की बोर्ड कव्हर मिळणार आहे. या टॅबेलेटची ग्रे व्हेरियंटची विक्री १४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री पासून सुरू करण्यात येणार आहे. Lenovo.com, Amazon.in and Flipkart.com या ई-कॉमर्स वेबसाइटवर ग्राहकांना हा लॅपटॉप खरेदी करता येऊ शकतो. तसेच देशभरातील ऑफलाइन रिटेलकडे सुद्धा हा लॅपटॉप खरेदी साठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

वाचाः

Lenovo Tab P11 Pro ची खास फीचर्स पाहा
या Lenovo Tab P11 Pro मध्ये ११.५ इंचाचा WQXGA डिस्प्ले दिला आहे. याची रिझॉल्यूशन साइज 2560×1600 पिक्सल इतकी आहे. यात टचस्क्रीन डिस्प्ले दिला आहे. एचडीआर सपोर्ट आणि डॉल्बी व्हिजन दिले आहे. अँड्रॉयड टॅबलेट मध्ये पॉवरसाठी ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७३० जी आणि अॅड्रेना ६१८ जीपीयू दिली आहे. हा लॅपटॉप अँड्रॉयड १० ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या लॅपटॉपमध्ये ६ जीबी रॅम दिला आहे. अँड्रॉयड टॅबलेटमध्ये १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने युजर्स २५६ जीबी स्टोरेज पर्यंत इंटरनल स्टोरेज वाढवू शकतात.

वाचाः

या लॅपटॉपला सिम सपोर्ट आणि डिजिटल पेन सपोर्ट दिला आहे. या लॅपटॉपमध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ८ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर दिला आहे. तसेच रियरमध्ये १३ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि ५ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा दिला आहे. या लॅपटॉपला पॉवर देण्यासाठी 8600mAh बॅटरी दिली आहे. तसेच क्विक चार्ज ३.० सपोर्ट सोबत रिव्हर्स चार्ज सपोर्ट दिला आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here