नवी दिल्लीः Moto G सीरिजच्या स्मार्टफोन्सला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. १० कोटी सीरिजच्या फोनची विक्री करण्यात आल्याने कंपनी सेलिब्रेशन करीत आहे. जी सीरिजच्या सात वर्षाच्या कालावधीत Moto G चे ८ जनरेशन स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले आहे. Moto G सीरिजच्या स्मार्टफोन्समध्ये लागोपाठ बदल करण्यात येत आहेत. पहिल्या जनरेशन मोटो जीच्या तुलनेत लेटेस्ट जी मॉडेलमध्ये खूप बदल पाहायला मिळतो आहे.

कंपनीने सुरुवातील स्वस्त किंमतीत चांगले फीचर असलेले स्मार्टफोन देण्याचा प्रयत्न केला होता. कमी किंमत असूनही मोटो जी सीरिजच्या फोनमध्ये ट्रू अँड्रॉयड एक्सपिरियन्स मिळतो. मोटोरोलाची हीच आयडिया इतर स्मार्टफोन कंपन्यांनी फॉलो केली आहे. मोटोरोला जी सीरिज अंतर्गत दरवर्षी लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सचे कौतुक क्रिटिक्सनेही केले आहे. कारण, या किंमतीत बेस्ट स्मार्टफोन घेऊन आली आहे. १० कोटी स्मार्टफोन्सच्या विक्रीची आकडेवारी पाहिल्यास यामागे कंपनीचा खूप मोठे सहकार्य राहिले आहे. ही आकडेवारी २०१३ ते आतापर्यंत झाली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीचा आणखी एक नवीन स्मार्टफोन Moto G Stylus लाँच करण्याच्या तयारीत कंपनी आहे. हा स्मार्टफोन स्टायलस सह येणार आहे. हा फोन Samsung Galaxy Note सीरिजसह येणाऱ्या S-Pen सारखा असू शकतो. या फोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ४ जीबी रॅम आणि १२८ जीबीचा स्टोरेज आणि ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात येणार आहे.

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here