नवी दिल्लीः Indian Railway Tourism and Catering Corporation (IRCTC) ने काही दिवसांपूर्वी आपली अधिकृत वेबसाइटला रिलाँच केले होते. यासोबतच रेल कनेक्ट अॅप ला नवीन इंटरफेस आणि फीचर्स सोबत बदलले होते. आता IRCTC ने एक नवीन पेमेंट गेटवे IRCTC iPAY लाँच केले आहे. ज्यात रेल्वे प्रवाशांना पेमेंट करणे सोपे होणार आहे.

वाचाः

IRCTC-iPay द्वारे पेमेंट करण्यासाठी आता युजर्संना आपल्या यूपीआय बँक अकाउंटच्या डेबिट कार्ड किंवा कोणत्याही पेमेंट फॉर्मचा वापर करण्याची परवानगी आणि डिटेल्स माहिती द्यावी लागणार आहे. युजर्सं IRCTC वर भविष्यात करण्यात येणाऱ्या ट्रान्झॅक्शनसाठी डिटेल्सचा वापर करू शकतील.

वाचाः

IRCTC वेबसाइट किंवा मोबाइल अॅप वरून तिकीट बुक करण्यासाठी IRCTC-iPay द्वारे इंस्टेंट रिफंड सुद्धा मिळणार आहे. IRCTC च्या माहितीनुसार ऑटोपे अॅप फॅसिलिटी साठी युजर्संला तिकीट बुक करण्यात सुविधा उपलब्ध होईल. तसेच तिकीट रद्द करताना रिफंड प्रक्रिया सोपी होईल. युजर्संचा विश्वास वाढवण्यासाठी IRCTC-iPay ने प्रयत्न सुरू केले आहेत. नवीन पेमेंट गेटवेवरून युजर्संचा टाइम सुद्धा वाचणार आहे.

वाचाः

IRCTC द्वारे युजर्स बस तिकीट सुद्धा बुकिंक करू शकते. गेल्या आठवड्यात IRCTC ने ऑनलाइन बस तिकीट बुकिंस सर्विस लाँच केली होती. IRCTC च्या माहितीनुसार, २९ जानेवारी पासून तिकीट बुकिंग सर्विस सुरू करण्यात आली आहे. बस तिकीट बुक करण्यासाठी युजर्संना https://www.bus.irctc.co.in/home वर जावे लागेल. युजर्सला आपल्या डिपार्चर आणि अराइवल डिटेल्स एन्टर करावे लागेल. प्रवाशी आपल्या सुविधे नुसार, सीट आणि बस सिलेक्ट करू शकतात. बस तिकीट बुकिंग करण्यासाठी युजर्स स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस जसे UPSRTC, GSRTC, OSRTC, APSRTC आणि Kerala RTC सुद्धा बुक करू शकतात. IRCTC मोबाइल अॅप मध्ये ही सुविधा मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत इंटिग्रेट करण्याची शक्यता आहे. यावरून सर्वसामान्य लोक सुद्धा मोबाइलवरून बस तिकीट बुक करू शकतात.

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here