नवी दिल्लीः इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्यांची आता खैर नाही. मोबाइलवर कोण कोण अश्लील व्हिडिओ पाहतोय, यावर १०९० ची एक टीम वॉच ठेवणार आहे. अश्लिल फोटो आणि व्हिडिओ पाहणाऱ्यांना अलर्ट केला जाणार आहे. यासोबत महिलांच्या सुरक्षेसाठी अलर्ट असलेले १०९० वेळोवेळी जागृत करण्याचे मेसेज सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर पाठवणार आहेत.

वाचाः

१०९० च्या एका आयोजित कार्यक्रमात एडीजी नीरा रावत यांनी इंटरनेटवरील वाढत्या सर्च मोहीमेसंबंधी बोलताना ही माहिती दिली आहे. १०९० ने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या माध्यमाचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. उत्तर प्रदेश मध्ये डिजिटल चक्रव्यूह (महिला सुरक्षेसाठी ३६० डिग्री इकोसिस्टम) साठी एक डिजिटल आउटरिच रोडमॅप तयार करण्यात आला आहे.

वाचाः

डेटाचे अॅनालिटिक्स केले जाणार
एडीजी नीरा रावत यांनी सांगितले की, इंटरनेटच्या अॅनालिटिक्सला स्टडी करण्यासाठी oomuph नावाची एक कंपनी आहे. डेटाच्या माध्यमातून इंटरनेट वर काय सर्च केले जात आहे. यावर वॉच ठेवला जाणार आहे. जर एखादी व्यक्ती इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ पाहत असेल तर त्याचे संकेत अॅनालिटिक्स टीमला मिळतील. टीम त्याच्यासंबंधी १०९० टीमला कळवणार आहे. त्या व्यक्तीला अलर्ट करण्यासाठी एक मेजेस पाठवला जाईल. असे करून गुन्ह्याच्या सुरुवातीला रोखता येऊ शकते.

वाचाः

>> उत्तर प्रदेशात ११.६० कोटी इंटरनेटचा वापर करीत आहेत.
>> यात १६ ते ६४ वयो गटातील व्यक्तीचा समावेश आहे. ग्रामीण भागात ६९ टक्के युजर्स आहेत.
>> एक व्यक्ती जवळपास ६ तास मोबाइल वापरत असल्याचे सिद्ध झाले आहे.

वाचाः

वाचाः

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here