वाचाः
गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये या कंपनीने Genshin Impact नावाचा एक गेम लाँच केला होता. याच्या मोबाइल व्हर्जनने अवघ्या दोन महिन्यात ४०० मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास २९२ कोटी रुपयांची कमाई केली होती. कर्मचाऱ्यांना इतके महागडे गिफ्ट देण्यामागे ही कमाई असल्याचे बोलले जात आहे. MiHoYo ने आपल्या Weibo अकाउंट आणि Facebook अकाउंटद्वारे नवीन वर्षात हे गिफ्ट वाटल्याची माहिती दिली. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना २०२० हे वर्ष चांगले गेले म्हणून या भेटवस्तू दिल्या आहेत. पोस्टमध्ये गिफ्ट्स शेयर केले आहेत. यात PS5, Apple iPhones, ग्राफिक्स कार्ड आणि Nintendo Switch चे हजारो डब्बे दिसत आहेत. या सर्व गिफ्ट्सना लॉटरी सिस्टमद्वारे वाटले गेले आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना नवीन लाँच झालेला आयफोन १२ स्मार्टफोन सुद्धा दिले आहे.
वाचाः
PS5 ला भारतात ३९ हजार ९९० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. तर आयफोन १२ सीरीजची भारतातील सुरुवातीची किंमत ६९ हजार रुपये आहे. Nintendo Switch ला Amazon वरून ३३ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकते. नवीन Macbook सीरीज़ची भरातातील सुरुवातीची किंमत ९२ हजार ९०० रुपये आहे.
वाचाः
वाचाः
वाचाः
वाचाः
Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times