नवी दिल्लीः
: व्हॉट्सअॅप ने गेल्या वर्षी प्लॅटफॉर्मवर अनेक खास फीचर्स आपल्या युजर्ससाठी आणले आहेत. आता कंपनी आणखी काही नवीन फीचर्स युजर्संसाठी आणणार आहे. या फीचर्सला आणण्यासाठी कंपनीकडून तयारी पूर्ण करण्यात येत आहे. या फीचरमध्ये मल्टी डिव्हाईस सपोर्ट पासून रिड लेटल यासारख्या फीचर्सचा समावेश आहे. या फीचर्सची युजर्संना फार उत्सूकता आहे. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी व्हॉट्सअॅपच्या अपकमिंग चार फीचर्स संबंधी खास माहिती देत आहोत, जाणून घ्या.

वाचाः

व्हॉट्सअॅप म्यूट व्हिडिओ
जर तुम्ही व्हॉट्सअॅपवर खूप सारे व्हिडिओ पाठवत असाल तर ही फीचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. या फीचरद्वारे व्हॉट्सअॅप युजर कोणत्याही कॉन्टॅक्टला व्हिडिओ पाठवण्याआधी म्यूट करू शकतो. म्हणजेच व्हॉट्सअॅप युजर्स कडून पाठवण्यात येणाऱ्या व्हिडिओचा आवाज बंद करू शकतो. सध्या या फीचरची टेस्टिंग केली जात आहे. व्हॉट्सअॅप या फीचरला सर्व युजर्ससाठी लवकरच रोल आउट करू शकतो.

वाचाः

व्हॉट्सअॅप रीड लेटर फीचर
व्हॉट्सअॅपचे रीड लेट फीचर अॅपमध्ये आधीच आर्काइव्ड चॅट्स (Archive Chats) चे नवी रूप असणार आहे. याद्वारे युजर्स कोणत्याही चॅट्सला जोपर्यंत हवे असेल तोपर्यंत आर्काइव्ड ठेऊ शकतो. यानंतर चॅटमध्ये कोणत्याही मेसेजचे नोटिफिकेशन युजर्सला मिळणार नाही. म्हणजेच युजर्स पूर्णपणे चॅट लपवू शकतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करू शकतो.

वाचाः

मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचर
या फीचरसंबंधी लागोपाठ माहिती समोर येत आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, या फीचरची टेस्टिंग बीटा व्हर्जन केली जात आहे. तसेच याला लवकरच रोल आउट केले जाऊ शकते. व्हॉट्सअॅप मल्टी डिव्हाइस सपोर्ट फीचरद्वारे युजर्स एक व्हॉट्सअॅप अकाउंटला एकाचवेळी चार डिव्हाइसपर्यंत चालवू शकतो. सध्या एका अकाउंटला एकाच डिव्हाइसवर चालवले जाऊ शकते.

वाचाः

व्हॉट्सअॅप लॉग आउट फीचर
ही फीचर नुकतेच दिसले होते. यात मल्टी डिव्हाइस फीचरचा काही भाग असल्याचे सांगितले गेले आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, यात युजर्स मल्टीपल डिव्हाइस ने आपले अकाउंट लॉग आउट करू शकतो. हे फीचर सध्या टेस्टिंग फेजमध्ये आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, हे व्हॉट्सअॅप बीटा साठी 2.21.30.16 अपडेट मध्ये दिसले आहे.

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here