नवी दिल्लीः स्मार्टफोन कंपनी विवो सध्या आपला नवीन स्मार्टफोन वर काम करीत आहे. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या सेल्फी-फोकस्ड स्मार्टफोन Vivo S7 5G चे रिप्लेसमेंट असल्याची चर्चा आहे. विवोने आतापर्यंत या फोनच्या लाँचिंगसंबंधी कोणतीही अधिकृत माहिती शेयर केलेली नाही. परंतु, नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा फोन ६ मार्च रोजी लाँच करण्यात येणार आहे. तसेच गेल्या आठवड्यात एका टिप्स्टरने अपकमिंग एस ९ सीरीजचे पोस्टर लीक केले होते. ज्यात फोनच्या रियर डिझाइनला पाहिले जाऊ शकते.

वाचाः

४४ मेगापिक्सलचा ड्यूअल फ्रंट कॅमेरा मिळणार
नवीन पोस्टरच्या माहितीनुसार, विवोच्या Vivo S9 5G मध्ये ४४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. Vivo S7 5G प्रमाणे यात नॉच स्क्रीन मिळणार आहे. ज्यात ४४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सोबत ८ मेगापिक्सलचा एक सेकंडरी कॅमेरा दिला जाणार आहे. फोनची रियर डिझाइन पाहून म्हटले जाऊ शकते की, हा फोन दिसायला जवळपास Vivo S7 5G सारखा आहे. बॅक पॅनेलवर रॅक्टांगुलर युनिट मध्ये तीन कॅमेरे दिले जाणार आहेत.

वाचाः

90Hz रिफ्रेश रेट आणि 64MP
टिप्स्टरने सांगितले की S9 5G चे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे हा फोन 6nm चिपसेट सोबत येणारा जगातील पहिला स्मार्टफोन असणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या लीक रिपोर्टमध्ये म्हटले होते की, या फोनमध्ये कंपनी गेल्या महिन्यात लाँच झालेले Dimensity 1100 5G चिपसेट ला ऑफर करू शकते. फोनमध्ये 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सुद्धा मिळू शकतो.

वाचाः

३३ वॉट फास्ट चार्जिंग आणि फुल एचडी प्लस डिस्प्ले
मॉडल नंबर V2072A ने गुगल प्ले कन्सोल आणि ३सी वर दिसले आहे. स्मार्टफोन विवो S9 5G म्हणून लाँच केला जाऊ शकतो. या दोन्ही प्लॅटफॉर्मच्या लिस्टिंगनुसार, विवोच्या या अपकमिंग फोनमध्ये फुल एचडी डिस्प्ले, १२ जीबी रॅम, डायमेंसिटी ११०० चिपसेट, अँड्रॉयड ११ ओएस आणि ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह 4000mAh बॅटरी मिळू शकते.

वाचाः

वाचाः

Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here